‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमातील हास्यवीर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. अनेक कलाकारांना याच कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली. तर गुणी अभिनेत्री वनिता खरातही हास्यजत्रेतून घराघरात पोहोचली. वनिता खरात अलीकडेच विवाहबंधनात अडकली. वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे याच्यासोबत २ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. तर वनिता आणि सुमितच्या लग्नसोहळ्याची सर्वत्र विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. कोळीवाड्याची रेखा म्हणून ओळखली जाणारी वनिता खरात चाहत्यांची लाडकी आहे. (vanita kharat priydarshini indalkar)
तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शो मधील अनेक कलाकार हे चित्रपटातही मिळतात. अशातच प्रियदर्शनी इंदलकर हीचा ‘ती फुलराणी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचं प्रियदर्शनी जोरदार प्रमोशन करतेच आहे मात्र एका हास्यजत्रेतील स्किटदरम्यान वनितानेही फुलराणीच प्रमोशन केलंय. स्किटदरम्यान प्रियदर्शनी आणि वनिता खरात यांची सासू सुनेची जोडी असते.
वनिता आणि प्रियदर्शनीचे हे स्किट पहा – (vanita kharat priydarshini indalkar)

त्यात प्रियदर्शनी वनिताला ‘आमच्या आई म्हणजे झेंडू आहेत झेंडू,’ असं म्हणते, यावर वनिता म्हणते, ‘काय म्हणलीस, हा झेंडू तुझ्यावर बसला ना तर पाकळ्या अशा कळम कळम करून नीच्या पडतील हा. बोलली मोठी फुलराणी. माझ्या नादाला नको लागू बया, नाहीतर मग, झगा मगा मला बघा नाय, झेंडू बसला पाकळ्या बघा असं व्हईल मग,’ असं म्हणत प्रिदर्शनीची खिल्ली उडवते. या स्किटचा प्रोमो प्रियदर्शनीने तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर करून तुझं काय करायचं ग वन्या असे कॅप्शन दिले आहे.(vanita kharat priydarshini indalkar)
====
हे ही वाचा – ‘आणि ती घरी आली..’ जयवंत वाडकरांच्या घरात नवीन सदस्याची एंट्री
====
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून वनिता हसून हसून लोटपोट करत असते. वनिता तिच्या अभिनयामुळे कमालीची लोकप्रिय आहे. मराठीच नाही तर हिंदीतही तिने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. याशिवाय वनिताचे फोटोशूटही चर्चेत आहेत. तिच्या फोटोशूटमधून तिने आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारा आणि स्वतःवर प्रेमही करा असा संदेशही दिला आहे. वनिता सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. तिच्या विविध अंदाजात फोटो ती सोशल मीडियावर शेअर करून धुमाकूळ घालत असते.(vanita kharat priydarshini indalkar)