या जगातील प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी काही न काही स्वप्न बघत असते. आणि ते साकार करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असते. पण काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींना स्वप्नांवरच समाधान मानावे लागते. चित्रपट सृष्टीमध्ये काम करत असणारी प्रत्येक व्यक्ती ही स्वतःचं घर आणि गाडी आपण कधी घेऊ या विचारातच असते. जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या घरी सुद्धा एक नवीन पाहुणी आली असून वाडकरांनी तीच थाटात स्वागत केले आहे. (jaywant wadkar)
जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांनी अनेक शैलीतल्या भूमिका साकारल्या आहेत. कामाबद्दलच्या पोस्ट, त्यांच्या आयुष्यात काय नवीन सुरु आहे त्या बद्दलची माहिती अशा अनेक पोस्ट जयवंत त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.
पहा काय घेतलं वाडकरांनी (jaywant wadkar)
नुकतीच त्यांनी एक कार घेतली असून त्यांनी त्या कारचा व्हिडियो त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या पोस्ट मध्ये त्यांनी त्यांच्या मुलीला टॅग केले असून याला त्यांनी “My new ride ! Here she comes home ” असे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या पोस्टवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गाडी घरी आल्याने जयवंत यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही अगदी द्विगुणीत झाला आहे.(jaywant wadkar new car)
जयवंत यांनी त्यांच्या करियरची सुरवात हिंदीतील “तेजाब” या सिनेमातून केली आहे. तर “एक गाडी बाकी अनाडी” या मराठी चित्रपटातून मराठी कलाविश्वात त्यांनी पदार्पण केले. त्यांनी १०० हुन अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामीनी वाडकर ही सुद्धा एक अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत कार्यरत आहे.(jaywant wadkar)
====
हे देखील वाचा – मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराची पैसे घेऊन विक्री, फाळके कुटुंबीयांनी व्यक्त केली खंत
====
मराठी सिनेविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये अभिनेते जयवंत वाडकर यांचे नाव टॉपला आहे. त्यांनी आजवर मराठीसृष्टीतील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. रुपेरी पडद्यावर जयवंत वाडकर यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या आहेत. फक्त मराठीमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्यांनी आपला ठसा उमठवला.