Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चा फिनाले जसजसा जवळ येत आहे तसतसा त्याचा प्रत्येक भाग अधिक रंजक बनत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एलिमिनेशन प्रक्रियेत खानजादी या शोमधून बाहेर पडली. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर तिने अनेक खुलासे केलेले पाहायला मिळत आहेत. खानजादीने तिचे कुटुंब व अभिषेकबरोबर असणाऱ्या तिच्या नातेसंबंधाबद्दलही भाष्य केलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या व अभिषेकच्या नातेसंबंधाबाबत खुलासा केला आहे.
खानजादीने ‘इटाइम्स’ला सांगितले की, “‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर मी खूप आनंदी आहे. मला असे वाटत आहे की, माझे स्वप्न ‘बिग बॉस’ने पूर्ण केले आहे आणि हे स्वप्न मी जगल्यानंतर घराबाहेर पडले आहे. मला माहित आहे की ,मी शोमध्ये चांगला खेळ खेळत होते मात्र नंतर माझा खेळ कमी झाला आणि याचा मला जोरदार फटका बसला. यासाठी मी कोणाला दोष देत नाही. या खेळात मी माझी वैयक्तिक माहिती सांगून खूप मोठी चूक केली. आणि याचा खूप मोठा तोटा मला भोगावा लागला. या दरम्यान मला खूप काही शिकायलाही मिळाले.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर झाली आई, कुटुंबात चिमुकलीचं आगमन
अभिषेकबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल खानजादी पुढे म्हणाली, “अभिषेक ब्लँकेट घेऊन माझ्या पलंगावर आला कारण विकी भाई अनुरागशी त्याच्या बेडवर बोलत होते. त्याला माझ्याशी काही वैयक्तिक गोष्टींबद्दल बोलायचे होते पण सना आमच्या बेडवर होती म्हणून त्याने तिच्या ब्लँकेटखाली जाण्याचा प्रयत्न केला पण मला वाटले की ते चुकीचे दिसेल म्हणून मी त्याला तसे न करण्यास सांगितले. घरातील सदस्यांनी याबाबत चर्चा सुरू केल्याने लोकांनी बाहेर बोलायला सुरुवात केली. अभिषेक व माझ्यामध्ये जे काही सुरु आहे ते त्याला व मला माहीत आहे. आमच्या दोघांमध्ये असे काही घडले असते तर निर्मात्यांनी ते क्षण पुन्हा पुन्हा दाखवले असते”.
याशिवाय खानजादीने ‘बिग बॉस’च्या कुटुंबियांबद्दल भाष्य केलं, “माझ्या मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा वैर नाही. एखाद्याला आपला शत्रू म्हणणे ही खूप मोठी गोष्ट आहे. अभिषेकसह माझे मतभेद होते, आम्ही खूप भांडलो पण आमच्यात खूप चांगली मैत्री होती. मला वाटतं, जो माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहतो तो खरा मित्र आहे. मला वाटतं अभिषेक माझ्या प्रवासाच्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर होता” असं म्हणत तिने एकूणच ‘बिग बॉस’ बद्दल भाष्य केलं.