शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

श्रेयस तळपदेला रुग्णालयामधून घरी कधी सोडणार?, जवळच्या मित्राने सांगितलं आता कशी आहे अभिनेत्याची परिस्थिती

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 17, 2023 | 4:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shreyas talpade when discharged from hospital

Shreyas talpade when discharged from hospital

अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला होता. हे बातमी ऐकताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. चित्रपटाच्या शुटिंगनंतर तो घरी आला आणि त्यानंतर ही घटना घडल्याचं सांगितलं जात होतं. त्याच रात्री त्याला रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता अभिनेत्याच्या प्रकृती स्थिर असल्याचं समोर येत आहे. श्रेयसला घरी कधी सोडणार याबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. श्रेयसचा मित्र व निर्माता सोहम शाह याने याबाबत नुकताच खुलासा केला.  (Shreyas talpade when discharged from hospital)

सोहम याने ‘इटाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितलं की, “श्रेयसला रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्याला ज्या रात्री रुग्णालयात नेण्यात आलं होतं त्या रात्री मी त्याला भेटायला गेलो होतो. आणि आजही मी त्याला भेटून आलो आहे. त्याच्या तब्येतीत बराच सुधार आहे. श्रेयसला हसताना आणि माझ्याशी बोलताना पाहून मला खूप मोठा दिलासा मिळाला. ही आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे”.

View this post on Instagram

A post shared by Deepti Shreyas Talpade (@deeptitalpade)

आणखी वाचा – जंगी पार्टी, आकर्षक सजावट अन्…; रवी जाधवांनी दणक्यात साजरा केला लग्नाचा २५वा वाढदिवस, व्हिडीओने वेधलं लक्ष

पुढे सोहम त्याच्या पत्नीचं दिप्तीबाबत बोलताना म्हणाला, “मी त्यांच्या पत्नीचे दीप्तीचेही खूप आभार मानू इच्छितो की अगदी खंबीर मनाने या सगळ्यात उभी राहिली आणि तिने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेच रुग्णालयात नेण्याचा निर्णय खूप महत्त्वाचा होता. या सगळ्या परिस्थितीत दिप्ती खंबीर राहिली हेच खूप मोठं आहे”, असं सांगत त्याने दिप्तीची तेव्हाची परिस्थिती व श्रेयसच्या आताच्या तब्येतीबाबत सांगितलं.

आणखी वाचा – Video : ‘बाईपण भारी देवा’च्या खास सेलिब्रेशनदरम्यान चाहत्यांचं प्रेम पाहून रडू लागल्या सुकन्या मोने, व्हिडीओ व्हायरल

श्रेयसचं हृदय दहा मिनीटांसाठी थांबलं होतं. यागोष्टीची माहिती अभिनेता बॉबी देओलने दिली होती. त्याने ‘बॉलिवूड हंगामा’शी बोलताना त्याने याबाबत सांगितलं होतं. बॉबी म्हणाला, “मी श्रेयसच्या बायकोशी बोललो. तो खूप चिंतेत होती. त्याचं हृदय जवळजवळ १० मिनीटांसाठी थांबलं होतं. त्यानंतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि त्याच्यावरचा धोका टळला. आता सगळ्यांनी त्याच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे”, असं बॉबी म्हणाला होता.  

Tags: bollywood actorfilmmaker soham shahshreyas talpade
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Genelia shares birthday post for husband Riteish

“मला कोणी...”, नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाची रोमँटीक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “तो संपूर्ण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.