शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सासूबाईंना पाहताच पटकन पाया पडले अन्…; क्रांती रेडकरने शेअर केला नवऱ्याचा खास व्हिडीओ, समीर वानखेडेंच्या संस्कारांचं होतंय कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 14, 2023 | 4:35 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actress kranti redkar shared special video on the occasion of her husband sameer wankhedes birthday

Video : सासूबाईंना पाहताच पटकन पाया पडले अन्…; क्रांती रेडकरने शेअर केला नवऱ्याचा खास व्हिडीओ, समीर वानखेडेंच्या संस्कारांचं होतंय कौतुक

अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर अधिक सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. ती तिच्या दैनंदिन जीवनातल्या अनेक घडामोडी सोशल मीडियाद्वारे मजेशीर अंदाजात चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या जुळ्या मुलींचे व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावरून शेअर करत असते. तसेच पती समीर वानखेडे व त्यांच्या कामाबद्दल माहिती देणारे अनेक फोटो-व्हिडिओदेखील ती शेअर करत असते. आज समीर यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी एका खास ठिकाणी हजेरी लावत त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे.  (Kranti Redkar On Instagram)

क्रांतीने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडीओमध्ये क्रांती-समीर यांनी गरजू मुलांबरोबर समीर यांचा वाढदिवस साजरा केला आहे. क्रांती-समीर यांनी गरजू मुलांना भेटवस्तू देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो आनंद त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरदेखील दिसत आहे. दरम्यान, या भेटीचे काही खास क्षण क्रांतीने व्हिडीओद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. 

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

आणखी वाचा – Video : वांद्रेमध्ये रस्त्याशेजारी वडापाव-भजीपाव खाताना अश्विनी भावेंना भलताच आनंद, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “पाटीलचा वडापाव…”

या व्हिडीओमध्ये समीर गाडीतून उतरताच क्रांतीच्या आईच्या पाया पडत आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. तसेच पुढे ते त्यांची विचारपूस करत त्यांच्याशी गप्पादेखील मारत आहेत. यानंतर ते एका ठिकाणी गरजू मुलांना भेट द्यायला गेले असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तिथे त्या लहान मुलांबरोबर ते संवाद साधतात. यावेळी ते त्यांना खाऊ, चॉकलेट व ब्लँकेट या भेटवस्तूही देतात. “प्रेमाने भरलेले हृदय हे देवाच्या सर्वात जवळ असण्याइतके चांगले आहे. समीरचा वाढदिवस या चिमुकल्या मुलांबरोबर साजरा केला याचा आनंद आहे” असं म्हणत क्रांतीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  

आणखी वाचा – पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी, प्रकरण नेमकं काय?, अभिनेत्रीची टीम स्पष्टीकरण देत म्हणाली, “धमकी मिळाली असल्याचं…”

दरम्यान, क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी समीर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याचबरोबर समीर-क्रांतीच्या या समाजभान जपणाऱ्या अनोख्या कृतीमुळे नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags: entertainmententertainment newskranti redkarmarathi entertainmentMarathi newsSameer Wankhede
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding

लग्नानंतर सुखाने संसार करत आहेत पियुष रानडे व सुरुची अडारकर, अभिनेत्रीच्या सासरी सत्यनारायणाची पूजा अन्…; फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.