सिनेसृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरू असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अशातच एका मराठमोळ्या कलाकार जोडीने त्यांचा विवाहसोहळा गुपचूप उरकल्याने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनेता पियुष रानडे व अभिनेत्री सुरुची अडारकर यांनी लग्न केलं असल्याचं समोर आलं आहे. दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. (Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding)
सुरुची व पियुष यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. दोघांनी त्यांच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटोस सोशल मीडियावरून पोस्ट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. सुरुची अडारकरचं हे पहिलं लग्न आहे तर पियुष रानडेचं हे तिसरं लग्न असल्याचं समोर आलं आहे. याआधीही पियुषची दोन्ही लग्न असफल ठरली आहेत. दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाच शिवाय त्यांच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेत ठरले.
यानंतर आता पियुष व सुरुची यांनी त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात केली आहे. लग्नानंतर या जोडप्याने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुरुचीने काही वेळापूर्वीच सत्यनारायणाच्या पूजेचा फोटो शेअर केला आहे. यावरून त्याच्या संसाराला सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे. सुरुची व पियुष यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. अगदी पारंपरिक अंदाजात त्यांनी हा विवाहसोहळा उरकला आहे.
सुरुची व पियुष यांच्या हळदीच्या रोमँटिक फोटोंवरही प्रेक्षकांनी भरभरून पसंती दर्शविली. तसेच त्यांच्या मेहंदीचेही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तर सुरुची व पियुषच्या रिसेप्शन लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. लग्नाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी व चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक कलाकारांनीही या सेलिब्रिटी कपलला शुभेच्छा दिल्या आहेत. पियुष-सुरूची ही जोडी ‘स्ट्रॉबेरी’ या नाटकाच्या निमित्तानं एकत्र आली होती. त्यानंतर त्यांनी ‘अंजली’ या मालिकेत एकत्र काम केले होते.