शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आईची तब्येत बिघडली असताना भरत जाधव लगेचच शूटिंग रद्द करुन निघाले अन्…; आई-वडिलांनीच सांगितलं होतं सत्य, म्हणालेले, “घट्ट मिठी मारत त्याने…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 14, 2023 | 10:20 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bharat jadhav mother told an old memory of actor video viral on social media

आईची तब्येत बिघडली असताना भरत जाधव लगेचच शूटिंग रद्द करुन निघाले अन्...; आई-वडिलांनीच सांगितलं होतं सत्य, म्हणालेले, "घट्ट मिठी मारत त्याने..."

मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध ‘विनोदवीर’ म्हणून भरत जाधव यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. आजवर अनेक विनोदी भूमिकांच्या माध्यमातून भरत यांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे. विनोदी भूमिकांसाह त्यांनी अनेक गंभीर भूमिकाही केल्या आहेत. ‘जत्रा’, ‘गोलमाल’, ‘जबरदस्त’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘साडे माडे तीन’ अशा अनेक चित्रपटांत काम करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर त्यांची ‘सही रे सही’, ‘ऑल द बेस्ट’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ यांसारखी अनेक नाटकंदेखील गाजली. अशातच त्यांचे ‘अस्तित्त्व’ हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले आहे. (Bharat Jadhav On Instagram)

भरत जाधव सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ किंवा कामसंबंधीची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अशातच त्यांनी इनस्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. भरत यांनी वाढदिवसानिमित्त आई-वडिलांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. स्टार प्रवाहवरील ‘सुप्रिया सचिन शो’ या कार्यक्रमात भरत यांनी त्यांच्या पत्नीसह हजेरी लावली होती. तेव्हा या कार्यक्रमात त्यांच्या आई-वडिलांनी भरत व त्यांच्या पत्नीचे कौतुक केले होते. याच खास आठवणींना उजाळा देत भरत यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

आणखी वाचा – कोल्हापूरमध्ये बंगला, शेती अन्…; आई-वडिलांची अशी सेवा करायचे भरत जाधव, जुना व्हिडीओ व्हायरल, म्हणाले, “उशिरा येऊनही माझे पाय दाबायचा अन्…”

या व्हिडीओमध्ये आई-वडिलांनी भरत यांचे खूप कौतुक केले आहे. त्याचबरोबर भरत हे त्यांच्या आई-वडिलांसाठी किती हळवे आहेत याचा एक किस्साही या व्हिडीओमध्ये आहे. त्यांच्या आईने हा किस्सा सांगितला आहे की, “एकदा मला बरं नव्हतं म्हणून सरिताचे चुलते-चुलती मला बघायला आले होते आणि तेव्हा भरत शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही सरिताला भरतला माझ्या आजारणाबद्दल काही सांगू नकोस असे सांगितले होते. पण केदारची बायको पुण्यात आली होती. तेव्हा तिने भरतला मला बरे नसल्याचे सांगितले. भरतला हे कळताच त्याने लगेच ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. मी शूटिंग नंतर करेन, पण मला आता माझ्या आईला बघायचं आहे असं म्हणून तो शूटिंगचे कपडे व मेकअप तसाच ठेवून मला  भेटायला आला आणि घरी येताच त्याने मला घट्ट मिठी मारली. माझी तब्येत तेव्हा बरी असल्याचं त्याला सांगूनही तो धावत पळत आला. इतका तो भित्रा आहे.”

आणखी वाचा – “सतत दात काढत असता”, मुग्धाने वैशंपायने होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोटो शेअर करताच नेटकऱ्याने सुनावलं, प्रथमेश लघाटे म्हणाला, “तुम्हालाच…”

या व्हिडीओमध्ये आई-वडिलांना बोलताना पाहून भरत जाधव व त्यांची पत्नी खूपच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. इतरांना कायम हसवणाऱ्या या अभिनेत्याचे आई-वडिलांप्रती हे प्रेम व आदर पाहून नेटकऱ्यांनीदेखील भरत यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, भरत जाधव यांचा ‘लंडन मिसळ’ नावाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर रंगभूमीवर त्यांचे ‘अस्तित्त्व’ हे नाटकदेखील चालू आहे. या नाटकात त्यांच्याबरोबर अभिनेत्री चिन्मयी सुमितदेखील आहेत.  

Tags: bharat jadhaventertaiunment newsmarathi actormarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Amruta Khanvilkar Shared Swami Incident

"आर्थिक अडचणीमुळे घर भाड्याने दिलं अन्…", अमृता खानविलकरला आली स्वामींची प्रचिती, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "स्वामींचा फोटो…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.