रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्याचा ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमातील प्रवास संपला, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला, “माझा वनवास…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 11, 2023 | 12:58 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Sameer Paranjape Eliminated

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्याचा 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमातील प्रवास संपला, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला, "माझा वनवास…"

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे समीर परांजपे. समीरची मालिकेतील अभिमन्यू ही भूमिका विशेष गाजली. समीर कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. समीरने त्याच्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकली. या कार्यक्रमामुळेही समीरचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला. अशातच काल समीर या स्पर्धेतून बाहेर झाला असल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Sameer Paranjape Eliminated)

समीरच्या आवाजाचे चाहते असणाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरु पाहायला मिळत आहे. अभिनेता समीर परांजपेने ‘सूर नवा ध्यास नवा’मधील आतापर्यंतच्या प्रवासाचे काही फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. “आयुष्यात एखादी प्रिय गोष्ट काही कारणांनी करायची राहून गेली की ती राहूनच जाते म्हणतात आणि फक्त दिवसेंदिवस आपल्यातलं, त्या गोष्टीतलं अंतर वाढत राहतं. आपण असहाय्यपणे फक्त बघत राहतो. हळहळत राहतो. ‘कट्ट्यावर वासरात लंगडी गाय शहाणी’ या म्हणीप्रमाणे २-४ मित्रांच्या टोळक्यात आपल्या गुरूने दिलेल्या शिदोरीवर पोसलेल्या कलेची चमक दाखवून वाह वाह मिळवत राहतो आणि अरे लेका तू हे सिरिअसली करायला हवं होतंस नाव काढलं असतंस हे ऐकून उगाचंच खूश होत राहतो. हे सगळं मी ही अनुभवलं आहे. मी ही तेच केलं. हावरटा सारखं गाणं जगून घेतलं”.

आणखी वाचा – अभिनेत्री व नृत्यांगना मुक्ती मोहनचा विवाहसोहळा संपन्न, ‘अ‍ॅनिमल’ फेम ‘या’ अभिनेत्याबरोबर केलं लग्न, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Sameer Paranjape (@sameer.paranjape2011)

पुढे अभिनेत्री रसिका सुनीलविषयी अभिनेत्याने लिहिलं, “रसिका सुनील तूही ‘सूर नवा…’चा प्रवास माझ्यासारखाच जगत आहेस. बोल्ड, बिनधास्त, ब्युटीफुल आणि उत्तम अभिनेत्रीमागची हळवी कलाकार मला कळली. खूप भावली. आपली मैत्री इथून सुरू झाली आहे ती अशीच राहील याची खात्री आहे. माझ्या सगळ्या स्पर्धक मित्रांनो तुमच्याकडून ही खूप गोष्टी शिकलो. तुम्ही सगळे कमाल आहात. गाते रहो” असं तो म्हणाला.

आणखी वाचा – ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात वैवाहिक बलात्काराच्या सीनवरुन होणाऱ्या चर्चांवर बॉबी देओलने सोडलं मौन, म्हणाला, “मला संकोच वाटत नव्हता पण…”

View this post on Instagram

A post shared by Sameer Paranjape (@sameer.paranjape2011)

यापुढे परीक्षकांसाठी पोस्ट लिहित अभिनेता म्हणाला, “मला कळलं कुठल्याही गाण्यातला भाव तुम्ही इतक्या ताकदीने पेश कसं करू शकता. तुमचं ‘माणूसपण’ तुमच्या प्रत्येक गाण्यात उतरतं बहुदा. परीक्षक म्हणून तुम्ही दिलेल्या कमेंट्समधून तर शिकलोच पण माणूस म्हणून ही खूप काही शिकवलंत. खूप प्रेम. माझा वनवास संपवलात यासाठी कायम ऋणात राहीन” असं म्हणत त्यांचे आभार मानले.

Tags: entertainmentmarathi actormarathi singersameer paranjapesur nava dhyas nava
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
riteish deshmukh trim hairs of his son

Video : घरीच रितेश देशमुखने कापले मुलाचे केस, देशमुखांच्या सूनेने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, तुम्ही पाहिलात का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.