‘बिग बॉस’च्या इतिहासात अशी खूप कमी जोडपी आहेत ज्यांचं नातं शो संपल्यानंतरही टिकून राहतं. त्यापैकी एक जोडपं म्हणजे प्रसिद्ध पंजाबी गायक हिमांशी खुराना व आसीम रियाज. हे दोघंही ‘बिग बॉस १३’च्या घरात असल्यापासून एकमेकांना डेट करत होते. दोघांच्याही चाहत्यांना त्यांनी लवकरात लवकर लग्न करावं असंही वाटत होतं. मात्र आता यासगळ्यात त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली आहे. नुकतंच हिमांशी व असीम यांनी एकमेकांशी अधिकृतपणे ब्रेकअप केलं आहे. याबाबत हिमांशी खुरानाने स्वतः सोशल मीडियावरून त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली आहे. (Himanshi khurana announces break up with asim riaz)
‘बिग बॉग’चं हे जोडपं ४ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. हिमांशीने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करुन ही माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली. एवढंच नाही तर तिने असीमपासून वेगळं होण्याचं कारणंही स्पष्ट केलं आहे. या पोस्टमध्ये हिमांशी लिहीते, “हो आता आम्ही एकत्र नाही. आम्ही एकत्र घालवलेला वेळ खूप छान होता. पण आता आम्ही दोघं वेगळे झालो आहोत. आमच्या नात्याचा प्रवास सुंदर होता, पण आता आम्ही दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे जात आहोत. आम्ही आमच्या धर्मांचा आदर करतो. आमच्या वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धांमुळे आम्ही आमच्या प्रेमाचा त्याग करतो. आम्ही विनंती करतो की आमच्या वैयक्तिक आयुष्यातील घेतलेल्या निर्णयाचा तुम्ही आदर करा – हिमांशी”, असं लिहीत तिने ही पोस्ट शेअर केली.

हिमांशीने इन्स्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली आहे. त्यात ती लिहीते, “आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केले, पण (वेगवेगळ्या धर्मांमुळे) यावर काही उपाय सापडला नाही. आम्ही एकमेकांवर बरंच प्रेम करतो पण नशीब आमच्या बरोबर नाही. इथे कोणाचा कोणावर द्वेष नाही. इथे फक्त प्रेमच आहे. हा समंजसपणे घेतलेला निर्णय आहे”, असं लिहीत तिने ही पोस्ट चाहत्यांबरोबर शेअर केली होती.

असीम ‘बिग बॉस १३’ची स्पर्धक होता. तर हिमांशी या शोमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून या शोमध्ये आली होती. त्यानंतर असीन तिच्या प्रेमात पडला पण त्यावेळी हिमांशी दुसऱ्या कोणाबरोबर तरी रिलेशनशिपमध्ये होती. त्यामुळे हिमांशीने असीमला तिच्यापासून लांब राहण्यास सांगितलं होतं. त्यानंतर हिमांशी घरातून बाहेर झाली. तिने ब्रेकअप केला आणि मग ती पुन्हा ‘बिग बॉस’च्या घरात आली. त्यानंतर असीमने तिला प्रपोज केलं. शोनंतर ते दोघं एकत्र राहू लागले. मात्र आता या दोघांनी वेगवेगळ्या धर्मांमुळे नातं संपुष्टात आणलं आहे.