रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्रास होऊनही भाडं…”, गेले चार महिने ऑस्ट्रेलियामध्ये राहत असलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “मानसिक आरोग्यावर परिणाम…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 4, 2023 | 12:14 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
yeu kashi tashi mi nandayala fame actress anvita phaltankar shared post about bad experince in australia and alerted to international students

"त्रास होऊनही भाडं…", गेले चार महिने ऑस्ट्रेलियामध्ये राहत असलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, "मानसिक आरोग्यावर परिणाम…"

सध्या परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे हे अगदी सहज व सोपे झाले आहे. त्यामुळे भारतात पुरेसे शिक्षण घेतल्यानंतर  अनेक भारतीय परदेशात कूच करतात. मराठीतील काही कलाकारदेखील आपल्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. अशातच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम अभिनेत्री तिच्या उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात गेली होती. ऑस्ट्रेलियात ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे तिथे तिला काही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आणि याच संदर्भात तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की, “आम्हाला गेल्या अनेक दिवसांपासुन हिटर – एअरकॉन डिव्हाईस बिघडल्याने त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात मी गेल्या चार महिन्यांपाससून ई-मेलद्वारे संपर्क करत आहे. इतका त्रास होऊनही आम्ही दर महिन्याला भाडे भरतो. यावर ना कोणता, उपाय ना आम्हाला याची आर्थिक भरपाई दिली आहे. दरम्यान या संपूर्ण परिस्थितीचा आमच्या राहणीमानावर व मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.”

आणखी वाचा – “पहिल्यांदा ते भेटले आणि…”, अशोक सराफांच्या भेटीनंतर समीर परांजपेची भावुक पोस्ट, म्हणाला, “ते मला ओळखतात याचं…”

यापुढे तिने “इतक्या प्रसिद्ध संस्थेकडून आम्हाला याची अपेक्षा नव्हती. जे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पुढील शैक्षणिक सत्रासाठी ऑस्ट्रेलियाला जात आहेत त्यांनी या संस्थेची निवड करू नका.” असं म्हटलं आहे. तसेच तिने तिच्या पोस्टमध्ये त्या संस्थेचं नाव मेन्शन करत ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करण्याची विनंतीदेखील केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय यादरम्यान तिला झालेल्या त्रासाबद्दल आवाज उठवल्याबद्दल तिचं कौतुकही केलं आहे.

आणखी वाचा – झी मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांची भावुक पोस्ट, म्हणाले, “सांगायला थोडं कठीण…”

दरम्यान, अन्विताने ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.  मुख्य अभिनेत्री म्हणून ही तिची पहिलीच मालिका होती. या मालिकेतील स्विटूच्या भूमिकेला अमाप लोकप्रियता मिळाली होती. दरम्यान  मालिका संपल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी विदेशात जाण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वीच ती शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेली.

Tags: entertainmententertainment newsmarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Mugdha Vaishampayan Father Retirement

Video : ३३ वर्ष नोकरी, सेवानिवृत्ती अन्…; मुग्धा वैशंपायनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर, नावाजलेल्या कंपनीमध्ये सन्मान आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.