प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात अभिनेता संदीप पाठकचा हात कोणी धरू शकत नाही. कॉमेडीसोबतच त्याने आशयघन विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली. संदीप सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रीय असतो. आपण भलं आणि आपलं काम भलं असं म्हणणाऱ्यांच्या यादीत संदीपच नाव गणलं जाऊ शकत नाही कारण सामाजिक, राजकीय सगळ्या गोष्टींवर दिलखुलास पणे आपलं मत मांडणार व्यक्तिमत्व संदीपच आहे.(sandeep pathak post on poilitcs)
संदीपने अशीच एक पोस्ट त्याच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वरून केली आहे ज्यामध्ये तो म्हणतोय ‘ मा. बाळासाहेब ठाकरें ची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल.
पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय… ‘. त्या पोस्ट खाली त्याने सर्व राजकीय पक्षांच्या ऑफिशियल सोशल हॅन्डल्सना टॅग केले आहे. एकूणच काय तर मराठी माणूस पंतप्रधान व्हावा मग तो कोणत्याही पक्षाचा झाला तरी चालेल अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह तमाम मराठी माणसांची असलेली इच्छा संदीप ने या ट्विटद्वारे बोलू दाखवली आहे.

निखळ विनोदी निर्मिती साठी संदीप मनोरंजन क्षेत्रात ओळखला जातो. तर समाजात दर्यादिली साठी म्हणून सुद्धा ओळखला जातो त्याच कारण असं कि काही दिवसांपूर्वी एका दौऱ्या दरम्यान रस्त्याने चालेल्या प्रवासी आजींना त्यांना हव त्या ठिकाणी जाणण्याची ठिकाणी पोहचवून आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस देखील उतरला.(sandeep pathak post on poilitcs)
====
हे देखील वाचा- ‘उठो, उठो, बाहेर बैठो चलो…’ संदीपने सांगितला इंडस्ट्रीत झालेल्या अपमानाचा किस्सा
====
अतिशय कष्टातून चित्रपटसृष्टीत नाव कमावणाऱ्या संदीप पाठकने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. नाटक, चित्रपट, मालिका अशी तिहेरी माध्यम त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर गाजवली आहेत. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक वर्गाची मनं तर त्याने जिंकली आहेतच पण आता महाराष्ट्राबाहेरही त्याने त्याच्या अभिनयाची छाप पाडली आहे. एकंदरीतच मराठी मातीतील सच्चा कलाकार म्हणून संदीप पाठकचं नाव अग्रस्थानी आहे असे म्हणणं तरी वावगं ठरणार नाही.