प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात अभिनेता संदीप पाठकचा हात कोणी धरू शकत नाही. कॉमेडीसोबतच त्याने आशयघन विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली. संदीप सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रीय असतो. सोशल मीडियावरील अनेक ट्रेंड तो फॉलो करताना दिसतो तसेच बरेच रिल्स व्हिडीओही तो शेअर करत असतो. इतकेच नव्हे तर एखाद्या विषयावर त्याचं मत देखील तो परखडपणे मांडत असतो. (sandeep pathak incident)
खेडेगावातून शहरात येऊन आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात छाप पाडणाऱ्या संदीप पाठकची संघर्षगाथा काही नवी नाही. स्वकर्तुत्वाने त्याने सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. संदीप मुंबईत जेव्हा अभिनय करण्यासाठी आला तेव्हा त्याला बऱ्याच कठीण प्रसंगांना तोंड दयावे लागले, त्याच्या या स्ट्रगलच्या काळात त्याला वाईट वागणूक मिळाली असल्याचा खुलासा संदीपने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.(sandeep pathak incident)
हे घडलं संदीप पाठक सोबत(sandeep pathak incident)
अभिनेता संदीप पाठकला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले की, सेटवर कधी अपमानास्पद वागणूक मिळाली आहे का? यावर उत्तर देताना संदीप म्हणाला, अर्थात, ती मिळायला हवी. अहो गरजेचेच असते ती. मोठं होण्याकरता अशी वागणूक फार गरजेची असते. सुरुवातीच्या काळात बसायला खुर्चीही न मिळणं, दहा वेळा चहा मागितल्यानंतर तोंडावर चहा फेकून मारणं असे अनेक किस्से आहेत.
पैसे मागायला गेलो की तर हमखास अशी वागणूक मिळायची. सिरियलचा निर्माता कुणी हिंदीवाला असतो. आपले राहिलेले असतात १२०० रुपये आणि १५०० रुपये तर प्रतिदिनाप्रमाणे ते पाच ते सहा हजार होतात. हे पैसे आपण मागायला आता गेल्यावर त्यांचाच नोकर येऊन म्हणतो, ए चलो उठो, उठो, बाहेर बैठो चलो. असे अनेकदा झालेलं आहे. त्याच्या मनात साचलेली ही खंत परखडपणे मांडत संदीपने चांगलाच चोप दिलाय, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
====
हे देखील वाचा- ‘दुनिया डोक्यावर घेणार हाय रं….’ ओंकार ने सांगितला व्हायरल गाण्यांमागचा किस्सा
====
अतिशय कष्टातून चित्रपटसृष्टीत नाव कमावणाऱ्या संदीप पाठकने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. नाटक, चित्रपट, मालिका अशी तिहेरी माध्यम त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर गाजवली आहेत. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक वर्गाची मनं तर त्याने जिंकली आहेतच पण आता महाराष्ट्राबाहेरही त्याने त्याच्या अभिनयाची छाप पाडली आहे. एकंदरीतच मराठी मातीतील सच्चा कलाकार म्हणून संदीप पाठकचं नाव अग्रस्थानी आहे असे म्हणणं तरी वावगं ठरणार नाही.(sandeep pathak incident)