मराठी मनोरंजन आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान तिच्या निरागस अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तेजश्री प्रधान हिने तिच्या अभिनयाची सुरुवात “या गोजिरवाण्या घरात” या मालिकेपासून केली. याचसोबत तिने अनेक मराठी सिनेमात आणि मालिकांमध्ये कामं केलं आहे. दिड वर्षांपूर्वी “अगं बाई सासूबाई ” या मालिकेत तेजश्री मुख्य भूमिकेत शेवटची दिसली होती. त्यानंतर तिने इतर मालिकेत साईड रोल केले. तेजश्रीने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली असून आता ही पोस्ट चर्चेमध्ये आली आहे.(Tejashri Pradhan)
तेजश्री हिने जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्यासोबत तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीये. यात तिने मोहन आगाशे यांच्यासोबत १२ वर्षांपूर्वीचा आणि १२ वर्षानंतरचा असे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर तिने १२ वर्षांपूर्वीचा फोटो आणि १२ वर्षांनंतर त्याचं रिक्रेअशन. ‘इतक्या वर्षांनी पुन्हा योग आला. पण तितकंच भारी फिलिंग आहे मोहन काका. आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात त्यातील काहीच शेवटपर्यंत राहतात. माझ्या पाठिशी कायम असल्याबद्दल तुमचे खूप आभार मोहन काका.’ असे कॅप्शन दिले आहे.
यातील पहिला फोटो हा “डॉ प्रकाश आमटे” या सिनेमात एकत्र काम करतानाचा आहे तर दुसरा फोटो हा एका भेटीनिमित्त नुकताच काढलेला आहे. तेजश्रीने “डॉ प्रकाश आमटे” सिनेमात डॉ. मंदाकिनी आमटे यांची भूमिका केली होती. सिनेमातील तिची भूमिका फारच छोटी होती पण अनेकांच्या लक्षात राहिली. तिनं तरूण वयातील मंदाकिनी आमटे यांची भूमिका साकारली होती. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या लग्नाचा सीन तेजश्रीसोबत चित्रीत करण्यात आलाय. याच सिनेमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी डॉ. बाबा आमटे यांची भूमिका साकारली होती. तेजश्रीनं तेव्हा मोहन आगाशे यांच्याबरोबर पहिल्यांदा काम केलेलं.(Tejashri Pradhan)
====
हे देखील वाचा- ‘मी आणि निखिल खूप….’ निखिल आणि स्नेहलच्या अफेरच्या चर्चांवर अखेर स्नेहल शिदमचं स्पष्टीकरण
====
“डॉ प्रकाश आमटे” या सिनेमाला आता १२ वर्ष पूर्ण झाले असून मोहन आगाशे आणि तेजश्री प्रधान हे पुन्हा एकत्र काम करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.