शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

CID फेम फ्रेडरिक्स उर्फ दिनेश फडणीस यांची प्रकृती चिंताजनक, हृदयविकाराचा झटका आल्याने व्हेंटिलेटरवर देत आहेत मृत्यूशी झुंज

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 3, 2023 | 11:24 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
CID fame Dinesh Phadnis Heart Attack

CID फेम फ्रेडरिक्स उर्फ दिनेश फडणीस यांची प्रकृती चिंताजनक, हृदयविकाराचा झटका आल्याने व्हेंटिलेटरवर देत आहेत मृत्यूशी झुंज

‘सीआयडी’ या लोकप्रिय टीव्ही शोचे जगभरात लाखो चाहते आहेत. या शोमधील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या शोमधील एका पात्राबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. इन्स्पेक्टर फ्रेडरिक उर्फ ​​दिनेश फडणीस यांच्याबाबतची एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या हा अभिनेता मृत्यूशी झुंज देत असल्याचं समोर आलं आहे. आजवर दिनेश फडणीस यांनी सिनेसृष्टीत बऱ्याच महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. (CID fame Dinesh Phadnis Heart Attack)

मीडिया रिपोर्टनुसार,’सीआयडी’चे निरीक्षक फ्रेडरिक्स उर्फ ​​दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिनेश फडणीस सध्या व्हेंटिलेटरवर असून ते जीवन मरणाशी झुंज देत आहेत. दिनेश फडणीस ५७ वर्षांचे आहेत. शुक्रवारी १ डिसेंबरच्या रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पण आता त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – “आधीची स्टेज…”, ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी देतेय कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराशी लढा, पोस्ट लिहीत म्हणाली, “डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा…”

View this post on Instagram

A post shared by Dinesh Phadnis (@dineshphadnis)

‘सीआयडी’मध्ये दया ही भूमिका साकारणाऱ्या दयानंद शेट्टी यांनीही दिनेश फडणीस यांच्या आरोग्याबाबतचे अपडेट दिले आहेत. दयानंद शेट्टी यांनी सांगितले की, “त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा थोडी बरी झाली आहे. त्याचे शरीर उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहे. तो लवकर बरा होऊन घरी परतावा, अशी आम्ही प्रार्थना करत आहोत” असं ते म्हणाले. दिनेश फडणीसबाबतची ही धक्कादायक बातमी ऐकून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

आणखी वाचा – “त्यांना चालताही येत नव्हतं अन्…”, वडील रमेश देव यांच्या शेवटच्या क्षणांबाबत अजिंक्य देव यांचा खुलासा, म्हणाले, “तरीही शूटला गेले आणि…”

९०च्या दशकातील लोकप्रिय शो ‘सीआयडी’ आजही लोकांच्या हृदयात स्थान करून आहे. या शोमध्ये दिनेश फडणीस यांनी इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दर्शविली होती. दिनेश फडणीस यांनी अनेक वर्षे ‘सीआयडी’मध्ये काम केले आहे. याशिवाय ते ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मध्येही दिसले आहेत. दिनेश गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर असलेले पाहायला मिळाले.

Tags: bollywood actorcidcid actordinesh phadnisentertainmentFrederickshindi tv showTv actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Bobby Deol Video

चित्रपटात एकही संवाद नसून रणबीरवरही भारी पडला बॉबी देओल; कौतुक ऐकून रस्त्यात ढसाढसा रडू लागला अभिनेता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.