बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यांना चालताही येत नव्हतं अन्…”, वडील रमेश देव यांच्या शेवटच्या क्षणांबाबत अजिंक्य देव यांचा खुलासा, म्हणाले, “तरीही शूटला गेले आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 2, 2023 | 5:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actor ramesh deo talk about his father ramesh deo and seema deo

“त्यांना चालताही येत नव्हतं अन्…”, वडील रमेश देव यांच्या शेवटच्या क्षणांबाबत अजिंक्य देव यांचा खुलासा, म्हणाले, “तरीही शूटला गेले आणि…”

मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी जोडी म्हणजे दिवंगत अभिनेते रमेश देव व अभिनेत्री सीमा देव. या जोडीने आतापर्यंत अनेक चित्रपट व नाटकांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. गेले अनेक दशक या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. रमेश देव व सीमा देव यांना अभिनय व अजिंक्य दोन अपत्य आहे. त्यापैकी अजिंक्य देव हे ‘माहेरची साडी’ या लोकप्रिय चित्रपटातून नावारूपास आले. तेव्हापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास अजून पर्यंतही चालूच आहे. दरम्यान ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी वडील रमेश देव यांची कामाप्रती असलेली निष्ठा व प्रेम याबद्दल सांगितले.  (Ajinkya Deo Talk About His Father Ramesh Deo)

यावेळी मुलाखतीत अजिंक्य देव यांनी बाबांबद्दलचा एक किस्साही सांगितला. यावेळी ते असं म्हणाले की, “मी सायन्समध्ये पदवीधर झालो होतो. प्रॉडक्शन हाऊस बाबांनी सुरु केलं होतं. पण मी हाडामासाचा कलाकार नाही. माझे बाबा चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे हाडामासाचे कलाकार होते. २०२२ मध्ये त्यांचं निधन झालं. २ फेब्रुवारीला ते गेले. निधनापूर्वी आठ दिवस आधी त्यांना चालतही येत नव्हतं. त्यांच्या पायांचं ऑपरेशन झालं होतं. त्यांची तब्येतही ठिक नसायची. मी घरी आलो तेव्हा मला कळालं की, बाबा बाहेर गेले आहेत. ते कुठे गेले आहेत हे कोणालाच माहित नव्हतं. रात्री १०-११ च्या दरम्यान घरी आले. तेव्हा कळलं की, ते कुठल्यातरी मालिकेचं चित्रीकरण करुन घरी आले आहेत. वयाच्या ९३व्या वर्षी त्यांनी हे सगळं केलं. निधनाच्या १५ दिवसांपूर्वी हे सगळं घडत होतं. ते खरे कलाकार होते. मी अपघाताने कलाकार झालो. मी शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये गेलो होतो. पण ते सगळं सोडून मी परत आलो होतो.”

आणखी वाचा – रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये मराठी कलाकारांचीच सर्वाधिक चर्चा, चित्रपटात मराठीतील ‘डॉल्बीवाल्या’ गाणंही वाजतं अन्…

याचबरोबर त्यांनी आई-वडिलांबरोबर घालवलेल्या खास क्षणांबद्दलही सांगितले. आईविषयी बोलताना ते म्हणाले की, “आई-बाबांबरोबरचे सगळेच प्रसंग खूप छान होते. मात्र कालांतराने आईला ‘अल्झायमर’ हा आजार झाला. ज्या बाईने आमच्यावर, तिच्या चाहत्यांवर आणि सगळ्यांवरच प्रेम केलं. तिला विस्मृती का व्हावी हा प्रश्न मला कायम पडतो. शेवटच्या दोन अडीच वर्षात तिच्याबरोबर घालवलेला वेळ मी कधीच विसरू शकत नाही. तेव्हा असं वाटलं की, आम्ही बरंच काही करू शकलो असतो, पण आम्ही केलं नाही, ही आमची चूकचं झाली. आणि हे आमच्यासाठी फार दुःखद होतं” असं म्हणत आईवडीलांच्या आठवणीत ते थोडे भावुकही झाले.

आणखी वाचा – Video : …अन् रितेश देशमुखने कार्यक्रमातच शिवाली परबला पाहता मारली मिठी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “कलाकाराकडून…”

दरम्यान, अजिंक्य देव यांनी आतापर्यंत मालिका, चित्रपट माध्यमांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर आगामी काळातही त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी या मुलाखतीत सांगितले. त्यामुळे त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी प्रेक्षक आतुर आहेत.

Tags: ajinkya deoentertainmentmarathi actorsmarathi entertainmentMarathi newsramesh deoseema deo
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Alia bhatt share a post for ranbir and raha

रणबीर कपूर-आलिया भट्टच्या लेकीने टाकलं पहिलं पाऊल, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत नवऱ्याचंही केलं कौतुक, म्हणाली, "आमच्या मुलीला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.