शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘प्रेमाची गोष्ट’च्या सेटवर कलाकारांची चिकन पार्टी, नेमकं काय केलं पाहा?, व्हिडीओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 29, 2023 | 3:52 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi seial premachi goshta serial actors and actresses enjoyed chicken party on set

Video : 'प्रेमाची गोष्ट'च्या सेटवर कलाकारांची चिकन पार्टी, नेमकं काय केलं पाहा?, व्हिडीओ व्हायरल

स्टार प्रवाह वाहिनीवरील नुकत्याच सुरू झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान व अभिनेता राज हंचनाळे यांच्या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. आतापर्यंत या मालिकेचे ५० हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. अगदी कमी वेळात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मालिकेतील रंजक वळणांमुळे ही मालिका अधिकच लोकप्रिय होत चालली आहे. (Chicken Party On Set Premachi Goshta Serial)

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या सेटवर कामाशिवाय काही इतर गमती जमतीसुद्धा होत असतात. मालिकेतील कलाकार हे अनेकदा कामानिमित्त बाहेर असतात. त्यामुळे त्यांना घरच्या जेवणाची आठवण येत असते. मात्र सेटवर कुणीतरी घरचे स्वादिष्ट जेवण आणले, तर सगळेच कलाकार त्यावर ताव मारतात. असाच काहीसा प्रकार या मालिकेच्या सेटवर झाला. या मालिकेच्या सेटवर नुकतीच चिकन पार्टी करण्यात आली. मालिकेत स्वातीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल गजमलने या पार्टीचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : बाथरुम घाणेरडं, कपडेही उचलत नाही अन्…; अंकिता लोखंडे ‘बिग बॉस’च्या घरात राहते घाणेरडी, ईशा मालवीयाचा आरोप, म्हणाली, “कित्येक दिवस…”

कोमलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या चिकन पार्टीचा खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांनादेखील या पार्टीत सामील करुन घेतले आहे. कोमलने शेअर केलेल्या या व्हिडीओत मालिकेतील बरेच कलाकार आहेत. तेजश्री प्रधान, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, माधुरी भारती, ऋषि राजकिरण, राज हंचनाळे, गिरीश वसईकर, उमेश घाडगे या सर्वांनी मिळून चिकन पार्टीचा मनमुराद आनंद घेतल्याचे दिसत आहे. मालिकेची पटकथा लेखिका व कवयित्री अश्विनी शेंडे हिने सर्वांसाठी चिकणची खास मेजवानी आयोजित केली होती.

आणखी वाचा – Video : ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार, आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत असून मुक्ता व सागर यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांना अधिकच आवडत आहे. त्याचबरोबर मालिकेतील सई ही बालकलाकार देखील चाहत्यांचे मालिकेतील मुख्य आकर्षण आहे. तिच्या सोज्वळ अभिनयाने ती साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Tags: entertainment newsMarathi newsmarathi serialpremachi goshtatejashree pradhan
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
rubina dilaik share terrible accident

"ट्रकने मागून कारला धडक दिली अन्…", गरोदरपणातच रुबीना दिलैकचा झाला होता भयानक अपघात, म्हणाली, “माझं डोकं…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.