झी मराठी वाहिनी वरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेत अप्पीची भूमिका अभिनेत्री शिवानी नाईक साकारत आहे. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली आहे. मालिकेतील तिची व अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. शिवानी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या या फोटोला चाहते लाईक्स वया कमेंट्स करत प्रतिसाद देतात. अशातच तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिवानीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिचे चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. शिवानीने नुकतीच नवीन कार खरेदी केली असून या कारची खास झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. शिवानी नवीन कार खरेदी करील गेली असताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिच्याबरोबर तिचे आई-बाबाही दिसत आहेत. एखाद्या माणसाला त्याच्या आयुष्यातील पहिली गोष्ट ही नेहमीच खास असते. अगदी तसंच शिवानीसाठी तिच्या आयुष्यातील कार अगदी खास गोष्ट आहे.
त्यामुळे तिने या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये पहिलीच गोष्ट खास असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर तिचे नवीन कार घेण्याचे स्वप्नदेखील पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. तसेच मालिकेतील अनेक कलाकारांनीही कमेंट्स करत तिचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
आणखी वाचा – Pooja Sawant Engaged : पूजा सावंतने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा, रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष
दरम्यान, ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून एका मुलीची संघर्षकथा सांगण्यात आली आहे. मालिकेत शिवानीच्या भूमिकेचे नाव अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी असं आहे. ती ग्रामीण भागातील एका खेडेगावात रहाते. तिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठलं मार्गदर्शन नाही. पण कलेक्टर होण्याचं तिचं स्वप्न आहे. यासाठी तिला येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करावी लागते आणि यावर मात करत ती अखेर कलेक्टर होते.