‘बिग बॉस १४’चा किताब जिंकणारी अभिनेत्री रुबीना दिलैक व अभिनेता अभिनव शुक्ला लवकरच आई-बाबा होणार आहेत. याबाबत पोस्ट शेअर करत त्यांनी हे बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. सध्या रुबीना तिचा गरोदरपणातील काळ चांगलाच इन्जॉय करताना दिसते. विविध ठिकाणी प्रवास करत ती फोटोशूटही करताना दिसते. तिने खास गरोदरपणातील फोटोशूटही केलं. बऱ्याचदा ती या फोटोंमुळे ट्रोलही झाली. पण काहींनी तिचं कौतुकही केलं आहे. रुबीना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचा चाहतावर्गही बराच मोठा आहे. ती जेव्हा कधी पोस्ट शेअर करते तर लाखो चाहते तिच्या पोस्टवर लाईक, कमेंटचा वर्षाव करताना दिसतात. अलिकडेच व्हिडीओ शेअर करत तिच्या आयुष्यातील गरोदरपणातील काळाचे अनुभव शेअर केले तसेच तिच्या आयुष्यातील भयानक प्रसंगाचाही उलगडा केला.(rubina dilaik share terrible accident)
या व्हिडीओतून तिने सांगितलं की, “जेव्हा आम्हाला कळलं की आम्ही जुळ्या मुलांचे आई-बाबा होणार आहोत. तेव्हा अभिनवला धक्का बसला. आम्ही दोघंही पूर्ण रस्त्यात एकमेकांबरोबर बोललो नाही. असं नक्कीच नव्हतं की आम्हाला आनंद झाला नव्हता. पण काही काळ आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की हे सगळं खरच असं आहे. आम्हाला डॉक्टरांनी ही बातमी ३ महिन्यापर्यंत कोणालाही न सांगण्यास सांगितली”.
पुढे रुबिना म्हणाली, “तीन महिन्यांनंतर, जेव्हा आम्ही स्कॅन केलं तेव्हा आमच्या बाळांचा अंश पाहता आम्हाला खूप आनंद झाला. त्यानंतर आम्ही दोघं बरेच खूश होतो. जेव्हा आम्ही घरी जात होतो तेव्हा आमच्या गाडीचा भयानक अपघात झाला. मागून आमच्या गाडीला ट्रक येऊन धडकला आणि माझं डोकं पुढे जाऊन आदळलं. त्यानंतर माझ्या पाठीला खूप जोरात धक्काही लागला होता. आजही त्या गोष्टी आठवून मला खूप भीती वाटते. तो अपघात माझ्यासाठी एका भयानक स्वप्नसारखा होता”.
अभिनव शुक्ला व रुबीना दिलैक यांचं लग्न २१ जून २०१८ला झालं होतं. लग्नाच्या ५ वर्षांनंतर हे जोडपं आई-वडील होणार आहेत. या दोघांच्या नात्यात बरेच चढ-उतार आले होते. याबाबतचे खुलासे रुबीनाने सलमान खानच्या ‘बिग बॉस १४’च्या पर्वात केले होते.