Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ हा शो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. स्पर्धकांमधील विकोपाला गेलेले वाद ही या शोची खासियत आहे. अशातच स्पर्धक म्हणून एंट्री घेतलेला युट्युबर अनुराग डोभाल सध्या चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून तो त्यांच्याकडे काही ना काही तक्रार करताना दिसत आहे. अशातच मागील भागात त्याने अनेकदा शोबद्दल नाराजी दर्शवली आहे. त्याच्या या नाराजगीवर ‘बिग बॉस’ने अखेर मौन सोडलं आहे. अनुरागच्या नाराजगीवर ‘बिग बॉस’ने पूर्णविराम लावला आहे आणि त्याला फटकारले असल्याचं समोर आलं आहे.
गेल्या भागात ‘बिग बॉस’ने अनुरागला चांगलीच तंबी दिली होती. अनुरागच्या तक्रारींना उत्तर देताना ‘बिग बॉस’ने स्पष्ट केले की “मी सीझनच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, यावेळी मी पक्षपाती असेल. या सीजनमध्ये डंके की चोटपर मधील स्पर्धक माझे आवडते असतील. यानंतर पुन्हा एकदा ‘बिग बॉस’ने अनुरागची शाळा घेत सांगितलं की, “तु क्रांतीची मशाल बनून स्पर्धकांचे कान भरत आहात. तर कधी ते पक्षपाती असल्याबद्दल बोलत आहेस, तर कधी त्यांच्यावर आरोप करत आहेस. यावरून मी तुला सांगतो की, सर्वजण माझ्या निमंत्रणावरूनचं इथे आले आहेत. जर काही तुझ्या मनासारखं होत नसेल तर तुम्ही सगळ्यांकडे जाऊन तक्रार करत रडता”.
बिग बॉस पुढे म्हणाले की, “तु माझ्याकडे तक्रार केली होती की, मी विकी व अंकिताला त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिलं पण तुझी तुझ्या कुटुंबियांशी भेट घडवून दिली नाही. आम्ही तुझ्या घरच्यांना फोन केला पण त्यांनी इथे येण्यास नकार दिला. यानंतर ‘बिग बॉस’ने अनुरागला आव्हान दिले की, यावेळी त्याच्यावर नक्कीच वार होईल”.
आणखी वाचा – फॅशन डिझायनर रोहित बल यांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात मृत्यशी देत आहे झुंज कारण…
‘बिग बॉस’ने दिलेली ही सूचना ऐकून अनुराग गोंधळतो. त्यानंतर तो सनी व अरुणसमोर म्हणतो की, “मी शो सोडतोय. त्यांनतर त्याने बिग बॉससाठी अपशब्द वापरत शिवीगाळ केली व तो पुढे म्हणाला, ‘मी माझा व माझ्या लोकांचा अपमान होऊ देऊ शकत नाही. ‘बिग बॉस’ दरवाजा उघडा, मला स्वइच्छेने एक्झिट घ्यायची आहे. मी २ कोटी रुपये देण्यासही तयार आहे” असं तो बोलताना दिसला. आता यावर ‘बिग बॉस’ काय निर्णय घेणार हे पाहणं रंजक ठरेल.