मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक अभिनेत्री या अभिनयाव्यतिरिक्त व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित, प्रार्थना बेहरे, अनघा अतुल, अभिज्ञा भावे यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी गेल्या काही दिवसांमध्ये व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आहे. अभिनय करता करताच या अभिनेत्री निर्मिती, कपडे, हॉटेल, दागिने व फॅशन यांसारख्या व्यवसाय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. अशातच या अभिनेत्रींमध्ये आणखी एक अभिनेत्री सहभागी झाली आहे ती म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक. (Actress Akshaya Naik Shared Instagram Post)
कलर्स वाहिनी वरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. या मालिकेत तिने लतिकाची भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ती सोशल मीडियावर चांगलीचं सक्रिय असते. तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या पोस्टखाली कॅप्शनमध्ये एक नोट लिहीत तिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमीही दिली आहे.
आणखी वाचा – “अंगात १०० ताप असताना…”, अमृता देशमुखच्या आईने लेकीच्या धाडसाचं केलं कौतुक, म्हणाली, “ज्याच्यावर ती वेळ…”
अभिनेत्रीने एका बंगल्याचा फोटो शेअर करत तिच्या नवीन व्यवसायाबद्दलची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. तिने हा फोटो शेअर करत असे म्हटले आहे की, “तुमच्या रोजच्या आयुष्यातून ब्रेक घेऊन निवांत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्यातील आमचे हे छोटेसे घर आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आमच्या ‘नाईक होम स्टे’मध्ये आजपासून तुम्हा सर्वांचं स्वागत आहे.” यापुढे तिने तिच्या या घराबद्दल माहिती देत असे म्हटले आहे की, “आमचं हे घरगुती हॉटेल पणजीपासून ८ किलोमीटर दूर आणि करमाळी रेल्वे स्थानकापासून फक्त ३.२ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे माझ्या घरात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहतेय.”
आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा येणार?, निलेश साबळेने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती, म्हणाला, “आता फक्त…”
अक्षया नाईकच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे त्याचबरोबर तिला या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. तसेच अनेकांनी तिला कमेंट्स करत एका दिवसाच्या भाडेदराबाबत चौकशी केली आहे. दरम्यान ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेनंतर तिने नाटकात पदार्पण केले आहे. सध्या ती ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.