शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यादिवशी खूप बोललो मात्र…”, अखिल मिश्रा यांच्या मृत्यूच्या दोन महिन्यांनी पत्नीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली, “फोनही केला पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 22, 2023 | 5:46 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
akhil Mishra wife Suzanne bernert emotional note

akhil Mishra wife Suzanne bernert emotional note

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्ट अभिनेता आमिर खान त्याच्या हटके चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याचे आजवर बरेच चित्रपट सुपरहिट ठरले आहे. त्यातील एक चित्रपट जो बराच गाजला तो म्हणजे ‘३ इडियट्स’. या चित्रपटातील सहकलाकार म्हणून काम केलेले अभिनेते अखिल मिश्रा यांचं काम चांगलंच गाजलं. अभिनेता अखिल यांचं २ महिन्यांपूर्वीच निधन झालं आहे. त्यांच्या स्वयंपाक घरात काम करत असताना टेबलावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या २ महिन्यांनंतरही त्यांच्या पत्नीला सुझान बर्नेटला त्यांची आठवण येत आहे. त्यांच्या बायकोने आठवणीत भावनिक पोस्ट लिहीली आहे. (akhil Mishra wife Suzanne bernert emotional note)

सुझानने अखिल यांच्या आठवणीत पोस्ट लिहीत त्यांच्याबरोबरचे बरेच फोटो शेअर केले. भावनिक कॅप्शन लिहीत ती म्हणते, “तुला जाऊन २ महिने होऊन गेले. मला अजूनही विश्वास बसत नाही आहे. माझं प्रेम मला सोडून गेलं. ज्या व्यक्तीबरोबर माझा प्रत्येक क्षण मला व्यथित करायचा आहे, सगळ्यात जास्त ज्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे ती व्यक्तीच निघून गेली”.

View this post on Instagram

A post shared by Suzanne Bernert (@suzannebernert)

आणखी वाचा – दारुची नशा, दोन वेळा हृदयविकाराचा झटका अन्…; सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची झाली होती वाईट अवस्था, म्हणाला, “मी पूर्णपणे…”

ती पुढे लिहीते, “मी हैदराबादमध्ये चित्रीकरणासाठी गेले होते आणि आपण दोघांनी एकमेकांना फोटोही पाठवले होते. त्यादिवशी आपण बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींवर चर्चा केली होती. माहित नव्हतं की सगळं शेवटचं आहे. ६वाजून १५ मिनीटांपासून मी तुला फोन करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यावेळी मला माहित नव्हतं की तू रुग्णालयात आहेस आणि त्यानंतर तू कायमचा निघून गेला. तू आता जिथेही आहेस तुला माहित आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करते”, असं लिहीत तिने अखिल यांच्या आठवणीत भावनिक होत पोस्ट लिहीली.

View this post on Instagram

A post shared by Suzanne Bernert (@suzannebernert)

आणखी वाचा – Bigg boss 17 Video : …अन् दुसऱ्याच अभिनेत्रीचा हात धरुन गार्डन एरियामध्ये बसला विकी जैन, फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

अखिल हे छोट्या पडद्यावरील बऱ्याच कार्यक्रमांत दिसले होते. ‘उतरन’, ‘उडान’, ‘सीआईडी’, ‘श्रीमान’, ‘श्रीमती’, ‘हातिम’ सारख्या मालिकाही केल्या. मालिकांसह त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘डॉन’, ‘गांधी’, ‘माय फादर’, ‘शिखर’, ‘कमला की मौत’, ‘वेल डन अब्बा’ सारख्या चित्रपटांमध्येही ते महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. त्यांनी आपल्या अभिनयातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.  

Tags: akhil Mishrabollywood actorwife Suzanne bernert
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
bigg boss 17 aishwarya sharma said in nomination task she never wash her husband neil bhatt undergarments

Bigg Boss 17 : “माझ्या नवऱ्याचे अंतर्वस्त्र...”, ‘बिग बॉस १७’च्या घरात नवऱ्याबद्दल ऐश्वर्या शर्माचं विचित्र भाष्य, म्हणाली, “मी कधीच...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.