रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिनेत्री भूमी पेडणेकर रुग्णालयात दाखल, उपचारादरम्यानचे फोटो शेअर करत म्हणाली, “तब्बल आठ दिवस…

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 22, 2023 | 2:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actress bhumi pednekar shared her photo on instagram account from hospital with the note of her health update

अभिनेत्री भूमी पेडणेकर रुग्णालयात दाखल, उपचारादरम्यानचे फोटो शेअर करत म्हणाली, “तब्बल आठ दिवस...

हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री भूमी पेडणेकर. भूमी तिचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या बोल्ड आणि बिनधास्त लूकमुळे ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहते. सोशल मीडियावर आपल्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत राहणारी ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिने नुकतीच शेअर केलेली तिची इन्स्टाग्राम पोस्ट. (Actress Bhumi Pednekar Shared Photo On Instagram)

भूमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे सेल्फी असलेले फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांसाठी एक पोस्टदेखील लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने चाहत्यांना तिच्या तब्येतीविषयीची अपडेट दिली आहे. ही पोस्ट शेयर करत तिला एका आठवड्यापूर्वी डेंग्यू झाल्याचा खुलासा केला आहे. त्याचबरोबर या पोस्टद्वारे तिने चाहत्यांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच तिच्या उपचारादरम्यान तिला मदत करणाऱ्या डॉक्टर व सर्व कर्मचाऱ्यांचे तिने आभार मानले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)

आणखी वाचा – video : ‘बाईपण भारी देवा’च्या अभिनेत्रींचा थायलंडमध्ये कल्ला, बांदेकरांची बायको क्रूजमधील व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “अशा ठिकाणी…”

भूमीने या पोस्टखाली कॅप्शनमध्ये असं म्हटल आहे की, “डेंग्यूच्या एका डासाने मला ८ दिवस त्रास दिला. पण आज जेव्हा मला जाग आली तेव्हा मला जरा बरं वाटलं. त्यामुळे मी सेल्फी घेण्याचा विचार केला”. यापुढे तिने चाहत्यांना तब्येतीविषयी सल्ला देत असं म्हटलं आहे की, “तुम्ही सर्व सावध रहा. मागील काही दिवस माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. तुमची प्रतिकारशक्ती वाढवा. प्रदूषणामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप खराब झाली आहे. माझ्या ओळखीच्या अनेकांना डेंग्यूचा त्रास झाला आहे. या विषाणूमुळे तब्येत खराब केली आहे”. यापुढे तिने रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, स्वयंपाकघर व सफाई कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर तिने आई, बहीण व मैत्रीण यांना धन्यवाद म्हणत त्यांचेही आभार मानले आहेत.

आणखी वाचा – Video : नवऱ्याने मान पकडताच अंकिता लोखंडेने विकी जैनला फेकून मारली चप्पल, व्हिडीओ तुफान व्हायरल, घरातील सदस्य म्हणाले…

दरम्यान भूमीने हे फोटो शेअर करताच चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर, धुपिया आदि कलाकार मित्रमैत्रिणीने “काळजी घे, लवकर बरी हो” अशा अनेक कमेंट करत तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनीदेखील तिच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त करत कमेंट्सद्वारे तिला लवकर बरं होण्याविषयी व काळजी घेण्याविषयीही सांगितले आहे.

Tags: bhumi pednekarbollywood actressbollywood newsentertainmententertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Swapnil Rajshekhar Post On Worldcup

ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या पायाखाली ट्रॉफी पाहून भडकला ‘तुला शिकवीन…’मधील सुप्रसिद्ध अभिनेता, म्हणाला, “जगात दहशतवाद…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.