छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिऑलिटी कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘बिग बॉस १७’. या कार्यक्रमातील प्रत्येक भाग नविन रंजक वळणं घेवून येत आहे. त्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. एकीकडे मुनव्वर फारुकी व मनारा चोपडा यांच्यातील वाढती केमेस्ट्री प्रेक्षकांना बरीच भावताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अंकिता लोखंडे व तिचा नवरा विकी जैन यांच्यातील वाद दोघांच्या नात्यात तक्रारी निर्माण करत आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्येही त्यांच्याबाबत नकारात्मकता निर्माण होतान दिसत आहे. यासगळ्यात आता नविन वळण आलेलं दिसत आहे. आता नविन भागात अंकिता लोखंडे गरोदर असल्याची बातमी समोर येत आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात त्यांच्या वादावादी चालू असताना हा एक मोठा ट्वीस्ट असल्याचं बोललं जात आहे. (Big boss 17 contestant ankita lokhande pregnancy)
अंकिताने २०२१मध्ये विकी जैनबरोबर लग्नबंधनात अडकली होती. त्यानंतर बऱ्याच वेळा ती गरोदर असल्याच्या अफवा समोर येत होत्या. त्यात आता ‘बिग बॉस १७’च्या घरात अंकिताच्या बोलण्यावरून ती गरोदर असल्याचं बोललं जात आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात अंकिता ही रिंकू व जिगनाबरोबर बोलताना दिसली. त्यावेळी अंकिताने तिला बरं वाटतं नसल्याचं सांगितलं. तिला संध्याकाळी उलटी होत असल्यासारखं वाटत होत आणि त्याचबरोबर तिला आंबट खाण्याचंही मनं होत असल्याचं तिने या दोघांना सांगितलं.
अंकिताच्या या बोलण्यावर रिंकू व जिगनाने तिची धट्टा करत ‘हा काही तरी प्रॉब्लेम झाला आहे’, असं सांगतात. ती दोघं पुढे तिला सांगतात, ‘हा काहीतरी चांगला प्रॉब्लेम आहे’, अशी प्रतिक्रिया देतात. त्यावर अंकिता लाजत त्यांना पुढे सांगते, ‘नाही असं काही नाही आहे. आता या घरात काय होणार? इथे सगळंच बंद आहे’. त्यावर रिंकू व जिगनाने तिला पुढे मस्करी करत सांगितलं, ‘हे अगोदरचे कर्म पण असू शकतात’. यावर अंकिताने सहमत दाखवत, ‘मलाही असंच वाटत’ असं सांगितलं.
यापूर्वीही अंकिताने बाळाच्या विचाराबाबत खुलेपणाने वक्तव्य केलं होतं. एका मुलाखतीत तिने हे स्पष्ट केलं होतं की ती पुढच्या वर्षी गरोदरपणचा विचार करणार आहे. पण ‘बिग बॉस’ मध्ये सुरु असलेल्या चर्चांद्वारे ती आताच गरोदर आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.