शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे…’ फेम मधुराणी प्रभूलकरला मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शाबासकीची थाप, फोटो शेअर करत म्हणाली, “अक्षरशः…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 13, 2023 | 4:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Madhurani Gokhale-Prabhulkar share a photo

'आई कुठे...' फेम मधुराणी प्रभूलकरला मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शाबासकीची थाप, फोटो शेअर करत म्हणाली, "अक्षरशः..."

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभूलकर. मधुराणीने ‘नवरा माझा नवसाचा’, ‘मणी मंगळसूत्र’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळेच तिला खरी लोकप्रियता मिळाली. मधुराणी मालिकेत ‘अरुंधती’ हे मध्यवर्ती पात्र साकारत असून तिच्या या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. ती केवळ अभिनेत्रीच नाही, तर उत्तम गायिका व कवयित्री देखील असून ती तिच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून विविध कविता चाहत्यांसमोर सादर करताना दिसते. (Madhurani Gokhale-Prabhulkar share a photo)

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या मधुराणीची एक पोस्ट सध्या बऱ्याच चर्चेत येत आहे. राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मधुराणीने नुकतंच एका दिवाळी पहाट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समोर चौघुले यांची साथ मिळाली होती. दरम्यान, या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदेंनी अभिनेत्रीच्या कामाचे कौतुक करत उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी केलेलं कौतुक पाहून मधुराणी भारावून गेली होती.

हे देखील वाचा – Video : आदेश बांदेकरांच्या एकत्रित कुटुंबाचं सर्वत्र कौतुक, इमारतीच्या पटांगणात औक्षणानंतर कारिट फोडलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

मधुराणीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या सोहळ्याचे काही फोटोज शेअर केले. ज्यात तिने एकनाथ शिंदेंकडून मिळालेल्या कौतुकाबद्दल आपली भावना व्यक्त केली. ती यात म्हणाली, “आजच्या ‘रंगाई दिवाळी पहाट’ला खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित होते. त्यांच्यासमोर कविता ऐकवल्या, गझल गायली आणि त्यांची उत्स्फूर्त दाद आणि शाबासकी यांनी आमची दिवाळी अक्षरशः उजळून निघाली.” तर, समीर चौघुले यांनीही या सोहळ्याचे काही फोटोज त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले.

हे देखील वाचा – “माझ्या लग्नात आपली…”, कविता मेढेकरांसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट, म्हणाली, “तुझ्याबरोबर काम करताना…”

तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मधुराणीवर कौतुकाचा वर्षाव केला. सध्या मधुराणी या कार्यक्रमांसह ‘आई कुठे काय करते’च्या शूटमध्ये व्यग्र असून ती याबाबतचे अनेक पोस्ट्स शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Tags: aai kuthe kaay karteMadhurani Gokhale-Prabhulkar share a photomadhurani prabhulkarmarathi actress
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
coffee with karan 8 new promo karan johar johar asked kareena about fight with ameesha patel

आमिषा पटेलचं नाव घेताच करीना कपूरने फिरवलं तोंड, दोघींमध्ये वाद झाला अन्…; नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.