मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आदेश बांदेकरांच्या एकत्रित कुटुंबाचं सर्वत्र कौतुक, इमारतीच्या पटांगणात औक्षणानंतर कारिट फोडलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 13, 2023 | 4:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aadesh Bandekar celebrates Diwali with family

Video : आदेश बांदेकरांच्या एकत्रित कुटुंबाचं सर्वत्र कौतुक, इमारतीच्या पटांगणात औक्षणानंतर कारिट फोडलं अन्...; व्हिडीओ व्हायरल

राज्यासह देशभरात दिवाळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी विविध प्रथा साजरी करताना विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी होताना दिसत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार मंडळींमध्ये देखील दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळी विविध प्रथा पार पाडत दिवाळी साजरा करताना दिसत आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकर हे सहकुटुंबिय दिवाळी साजरी करत असून या क्षणाचा एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Aadesh Bandekar celebrates Diwali with family)

धनत्रयोदशीच्या दिवसापासून ते भाऊबीजेपर्यंत अनेक प्रथा या दिवाळीत मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातात. ज्यामध्ये सकाळी उटणे लावून अभ्यंगस्नान, पायाने कारिट फोडणे यांसारखे अनेक प्रथा केल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे पायाने कारिट फोडणे. दर नरक चतुर्दर्शीला अभ्‍यंगस्‍नानापूर्वी कारिट फळ फोडून त्यानंतर पायावर गरम पाणी ओतले जाते. ही प्रथा अनेक ठिकाणी केली जात असून आदेश यांनी सहकुटुंबीय पायाने कारिट फोडून दिवाळी सणाला सुरुवात केली.

हे देखील वाचा – “आता राडा होणार”, अखेर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पुन्हा परतला ओंकार भोजने?, प्रोमो समोर, म्हणाला, “वाटलं तर मी येतो नाहीतर…”

आदेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिवाळी साजरी करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर, लेक सोहम, त्यांचे भाऊ व इतर नातेवाईक दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला त्यांच्या घराबाहेरील आकाश कंदीलची एक झलक दाखवली आहे. पुढे बांदेकर कुटुंबातील सर्व मंडळी पायाने कारिट फोडून एक महिला त्यांच्या पायावर गरम पाणी ओतताना दिसतात. पुढे सुचित्रासह घरातील अन्य महिला सदस्य त्यांचं औक्षण करत आहे. पुढे हे संपूर्ण कुटूंब त्यांच्या घरातील एका सदस्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधतात. यावेळी संपूर्ण बांदेकर कुटुंबियांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसत आहे. या व्हिडीओला आदेश यांनी “सहकुटुंब सहपरिवार दिवाळी शुभेच्छा” असं सुंदर कॅप्शन दिलं आहे.

हे देखील वाचा – Video : …अन् ‘टायगर ३’ चित्रपट सुरु असतानाच थिएटरमध्येच प्रेक्षकांनी फोडले फटाके, पळापळ झाली आणि…; भयानक व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आदेश यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. त्याचबरोबर, अनेकांनी कमेंट्सद्वारे आदेश व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आदेश यांचा ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रम दुबईत पार पडला होता. यावेळी तेथील असंख्य वाहिनी व खास मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले होते. त्या सोहळ्याचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. त्याचबरोबर, ते ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमातून घराघरातील वहिनींशी अनेकदा संवाद साधताना दिसतात. तसेच सोशल मीडियावर विविध पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

Tags: Aadesh BandekarAadesh Bandekar celebrates Diwali with familysoham bandekarsuchitra bandekar
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Mrunal Dusanis Diwali Look

अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेत अमेरिकेमध्ये कायमची स्थायिक झालेली 'ही' मराठी अभिनेत्री आता दिसते अशी, दिवाळीचे फोटो पाहता चाहते म्हणाले, "भारतात कधी परतणार?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.