रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मराठी पोरी दुनियेला दाखवती माज…”, घरातच सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचा भन्नाट धिंगाणा, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “मराठी बायको…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 10, 2023 | 4:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Siddharth Mitali Dance

“मराठी पोरी दुनियेला दाखवती माज…”, घरातच सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचा भन्नाट धिंगाणा, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "मराठी बायको…"

एकामागोमाग एक मराठी चित्रपट सध्या सिनेसृष्टीत धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहेत. अशातच यांत भर घालत आणखी एका चित्रपटाची लवकरच भर पडणार आहे. तो चित्रपट म्हणजे ‘झिम्मा २’. याआधी आलेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. त्यानंतर आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला झिम्मा २ हा चित्रपट येत आहे. चित्रपटाच्या टीझरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तेव्हापासून चाहत्यांच्या मनात चित्रपटाबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. (Siddharth Mitali Dance)

चित्रपटाचा टीझर लॉंच झाल्यावर यातील “मराठी पोरी…” हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गणयने अल्पावधीतच प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडलं. या गाण्यामध्ये चित्रपटातील इंदू डार्लिंगच्या ७५ व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. या गाण्यातून स्त्रीत्वाचे अनेक पदर उलगडताना दिसले. स्त्रियांवर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतंय.

आणखी वाचा – नवऱ्याला घट्ट मिठी मारली अन्…; दोन महिन्यांनी महाबळेश्वरमध्ये बांधलेल्या घरी पोहोचली मृण्मयी देशपांडे, असं आहे फार्महाऊस

“मराठी पोरी दुनियेला दाखवती माज…” हे गाणं प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांनी या गाण्याला डोक्यावर उचलून धरलं. या गाण्यावर नेटकरी, सिनेविश्वातील अनेक कलाकार रिल्स बनवत आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत आपल्याला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पाहायला मिळतोय. हे गाण्यावर सिद्धार्थ त्यांची धर्मपत्नी अभिनेत्री मिताली मयेकरसह थिरकला. मिताली व सिद्धार्थला या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही. सिद्धार्थने त्याच्या घरी बायकोसह भन्नाट डान्स करत व्हिडीओ शेअर केला.

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

आणखी वाचा – परदेशात राहत असलेल्या लेकाला भेटायला निघाला प्रसाद ओक, बायको मुलासह विमानातील फोटो शेअर करत म्हणाला, “ही टूर…”

मिताली सिद्धार्थने मराठी पोरी या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या व्हिडीओला अभिनेत्याने “मराठी पोरी with मराठी बायको!” असं हटके कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. अत्यंत कमी कालावधीत सिद्धार्थ मितालीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत या दोघांचं कौतुक केलं आहे आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. ‘झिम्मा २’ चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर असे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत.

Tags: entertainmentjhimma 2marathi moviemitali mayekarsiddharth chandekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
amruta khanvilkar share instgram story thanks raj Thackeray

अमृता खानविलकरसाठी राज ठाकरेंकडून दिवाळीची खास भेट, गिफ्टमध्ये नक्की काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.