रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : गळाभेट, फोटोसेशन अन्…; आदेश बांदेकर दुबई विमानतळावर पोहोचल्यावर काय घडलं पाहा?, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 10, 2023 | 5:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aadesh Bandekar welcomes his colleagues in Dubai

Video : गळाभेट, फोटोसेशन अन्…; आदेश बांदेकर दुबई विमानतळावर पोहोचल्यावर काय घडलं पाहा?, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

महाराष्ट्रातील तमाम वहिनींचा लाडका कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ने नुकतंच १९ वर्ष पूर्ण करून २०व्या वर्षात पदार्पण केले. सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांनी ‘दार उघड बये… दार उघड’ असं म्हणत तमाम वहिनींना आपलंसं केलं. त्यांच्याशी संवाद साधत आणि विविध खेळ खेळले. आणि पैठणीच्या रूपात त्या वहिनींचा सन्मान केला. याच कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर हे केवळ महाराष्ट्राचे नाही, तर देश-विदेशातील तमाम महिलांचे लाडके भावोजी बनले. आपल्या परिसरात आदेश भावोजी पैठणी घेऊन कधी येणार? असं प्रत्येक वहिनींना वाटतं. अशात आदेश भावोजी विदेशातील ‘त्या’ महिलांसाठी पैठणी घेऊन पोहोचले. (Aadesh Bandekar welcomes his colleagues in Dubai)

दर संध्याकाळी छोट्या पडद्यावर येणारे आदेश भावोजी त्यांच्या ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याच्या विविध ठिकाणी दौरे करत असतात. त्यांच्या कार्यक्रमांना इतकी प्रसिद्धी मिळाली की, त्याचे कार्यक्रम देश-विदेशातही झालेले आहे. दिवाळीनिमित्त ‘महाराष्ट्र मंडळा’च्या वतीने आदेश यांचा ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रम दुबईत पार पडणार आहे. यानिमित्ताने ते नुकतेच दुबईत पोहोचले. यावेळी त्यांच्यासह त्यांचे सहकारी सुनिल कुरपे, कैलास तवले आणि त्यांचा लेक सोहम देखील देखील येथे पोहोचले.

हे देखील वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पारंपरिक पद्धतीने बनवले कणकेचे दिवे, व्हिडीओही केला शेअर, म्हणाली, “इतर दिव्यांच्या तुलनेत…”

आदेश बांदेकर हे दुबईत पोहोचताच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते दुबई विमानतळाबाहेर त्यांच्या सहकाऱ्यांची वाट पाहत आहे. यावेळी त्यांचे सहकारी सुनिल कुरपे व कैलास तवले येथून उतरताच त्यांनी या दोघांची गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले. पुढे हे सर्वच जण विमानतळातून बाहेर पडत कार्यक्रमस्थळी निघतात. यावेळी कारमध्ये त्यांच्यासह त्यांचे सहकारी व सोहम बसलेले आहे. या व्हिडिओमध्ये दुबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांची झलक सुद्धा दाखवतात.

हे देखील वाचा – अमृता खानविलकरसाठी राज ठाकरेंकडून दिवाळीची खास भेट, गिफ्टमध्ये नक्की काय?

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

या व्हिडीओला कॅप्शन देताना ते म्हणाले, “गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे साथ सोबत करणारे कैलास आणि सुनिल दुबईत “खेळ मांडियेला”साठी धनत्रयोदशी दिवशी दुबईत पोहोचले. धन्यवाद महाराष्ट्र मंडळ, दुबई”. त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून यावर अनेक जण त्यांचे भरभरून प्रेम देत आहे. तसेच काहींनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Aadesh BandekarAadesh Bandekar welcomes his colleagues in Dubaihome ministerkhel mandiyela
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Ashvini Mahangade Emotional

Video : …अन् 'आई कुठे…'मधील कांचन आजीला 'ती' अभिनेत्री मिठी मारुन ढसाढसा रडू लागली, म्हणाली, "नाराज होते, चिडते आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.