शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पारंपरिक पद्धतीने बनवले कणकेचे दिवे, व्हिडीओही केला शेअर, म्हणाली, “इतर दिव्यांच्या तुलनेत…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 10, 2023 | 4:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
star pravah serial thipkyanchi rangoli fame sarika nawathe making diwali special diva video and post on social media

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पारंपरिक पद्धतीने बनवले कणकेचे दिवे, व्हिडीओही केला शेअर, म्हणाली, "इतर दिव्यांच्या तुलनेत..."

सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल सुरू आहे. सामान्य जनतेबरोबरच कलाकार मंडळींमध्ये देखील दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळी आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांबरोबर दिवाळीचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. अशातच ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम सारिका नवाथे या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर दिवाळीनिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सारिका कणकेचे दिवे करताना दिसत आहे. (Sarika Nawathe Shared Diwali Special Video)

सारिकाने कणकेचे दिवे करतानाचा हा व्हिडीओ शेअर करत त्याखाली लिहिले आहे की, “रील्स पाहत असताना हे क्यूट गुलाबा सारखे कणकेचे दिवे कसे करायचे ते पाहिले आणि छान वाटलं. हा व्हिडीओ पाहून असं वाटलं की आपण पण हे करून बघू.” यानंतर ती असं म्हणाली की, “कणकेचा दिवा हा इतर दिव्यांच्या तुलनेत अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो. अंधकारावर प्रकाशाचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. अंधार हा कितीही गडद असला तरी प्रकाशाची एक किरण त्याला भेदू शकते. अंधाराचा नाश करू शकते.” सारिकाने हा व्हिडीओ शेअर करत तिच्या चाहत्यांना “तुम्ही या दिवाळीनिमित्त काय स्पेशल करताय?” असंही म्हटलं आहे. त्याचबरोबर “तुम्ही जे काही नवीन शिकलात वा तुम्ही काही वेगळं करत असाल तर ते नक्की शेअर करा.” असं म्हणत तिने तिच्याबरोबर चाहत्यांना देखील यात सहभागी करून घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sarika Harshvardhan Nawathe (@sarikanawathe)

आणखी वाचा – नवऱ्याला घट्ट मिठी मारली अन्…; दोन महिन्यांनी महाबळेश्वरमध्ये बांधलेल्या घरी पोहोचली मृण्मयी देशपांडे, असं आहे फार्महाऊस

‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत बेबी आत्या ही भूमिका ही कमी कलावधीसाठी होती. मात्र कमी कालावधीतच या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. दरम्यान ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे सध्या या मालिकेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेच्या शेवटच्या दिवसाचं शूटिंग पार पडलं.

आणखी वाचा – “मराठी पोरी दुनियेला दाखवती माज…”, घरातच सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचा भन्नाट धिंगाणा, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “मराठी बायको…”

सारिकाने शेअर केलेल्या या व्हिडिओखाली तिच्या अनेक चाहत्यांनी तिला प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेते अविनाश नारकर यांनीदेखील या व्हिडीओखाली ‘व्वा व्वा व्वा व्वा व्वा… सारिका…. क्या बात है…!’ असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. तर अविनाश यांच्या या प्रतिक्रियेवर सारिकानेदेखील मजेशीर अंदाजात ‘हो आपण सतत दिवे लावत राहायचे. असं म्हणत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत, “शुभ दीपावली”, असं म्हटलं आहे.

Tags: marathi serialthipkyanchi rangoli
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Aadesh Bandekar welcomes his colleagues in Dubai

Video : गळाभेट, फोटोसेशन अन्…; आदेश बांदेकर दुबई विमानतळावर पोहोचल्यावर काय घडलं पाहा?, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.