रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुबईला निघाले आदेश बांदेकर, आता पैठणीचा खेळ परदेशात रंगणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “इतके वर्ष…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 7, 2023 | 12:10 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Aadesh Bandekar On Khel Mandiyela

दुबईला निघाले आदेश बांदेकर, आता पैठणीचा खेळ परदेशात रंगणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाले, "इतके वर्ष…"

महाराष्ट्रातील लाखो वहिनींचा हक्काचा आणि लोकप्रिय कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाने १९ वर्ष पूर्ण करून २०व्या वर्षात पदार्पण केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांनी ‘दार उघड बये दार उघड’ म्हणत महाराष्ट्रातील तमाम वहिनींना बोलतं केलं. त्यांच्यासोबत विविध खेळ खेळत बक्षिसांच्या रूपात पैठणी देत वहिनींचा सन्मान केला. सायंकाळी महिलावर्गाच्या मालिकांची सुरुवातच ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने सुरु होते. (Aadesh Bandekar On Khel Mandiyela)

‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. महाराष्ट्रातचं नव्हे तर परदेशातील महिला वर्गालाही या कार्यक्रमाची भुरळ पडली आहे. आदेश बांदेकर पैठणी घेऊन कधी येणार असं सर्वच महिलांना वाटत असतं. आता मात्र परदेशातील महिलावर्गासाठी आदेश बांदेकर एक आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. ‘महाराष्ट्र मंडळ, दुबई’ यांच्या वतीने आयोजित ‘खेळ मांडियेला’ या कार्यक्रमासाठी यंदाच्या दिवाळीत बांदेकर दुबईला पैठणी घेऊन जात आहेत.

आणखी वाचा – “मराठी मुलगा बिझनेस करतोय याचं…”, सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर मिलिंद गवळींची पोस्ट; म्हणाले, “आई-बापाच्या जीवावर…”

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

याचा एक व्हिडीओ आदेश बांदेकर यांनी इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. यांत दुबईला कार्यक्रमासाठी जातानाचा आनंद व्यक्त करत ते म्हणाले, “नमस्कार, २००४ या वर्षांमध्ये ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम सुरु झाला. काय बांदेकर आमच्या घरी कधी? असा प्रश्न घराघरातून विचारला जाऊ लागला. त्याचबरोबर परदेशातूनही बांदेकर आमच्या घरी कधी असं विचारत होते. आणि तो योग आता जुळून आला आहे. २०२३ वर्षातील दिवाळीच्या पूर्वसंध्याकाळी ‘महाराष्ट्र मंडळ दुबई’ यांच्यावतीने सुवर्णपर्व साजरं होतंय. इतकी वर्ष जल्लोषात कार्यक्रम साजरे केल्यानंतर माय माऊलींना आनंद देणाऱ्या या कार्यक्रमात तसेच तुम्ही या सुवर्णपर्वात, हा सुवर्ण क्षण, हा आनंद द्विगुणित करण्यासाठी या. त्याचबरोबर हा जल्लोष साजरा करत असताना आनंदाची आतषबाजी करण्यासाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येला मी येतोय ‘महाराष्ट्र मंडळ दुबई’ यांनी आयोजित केलेल्या ‘खेळ मांडियेला’ या कार्यक्रमासाठी. तेव्हा बघूया दुबईतली पैठणी कोण जिंकणार. येतोय लवकरच दुबईला.”

आणखी वाचा – ‘तो’ आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या पाठिंब्यावर रश्मिका मंदानाची पोस्ट, म्हणाली, “तुमच्यासारख्या लोकांमुळे…”

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

तर आणखी एक दुबईच्या दिशेने प्रवास सुरु करत आदेश बांदेकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे, यांत ते म्हणत आहेत की, “दुबईच्या दिशेने, मुंबई एअरपोर्टवर पोहोचलेलो आहे. आणि निघालो आहे ‘खेळ मांडियेला’च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी दुबईच्या दिशेने. तेव्हा येत आहे ‘खेळ मांडियेला’ हा कार्यक्रम घेऊन दिवाळीच्या पूर्वसंध्येला दिवाळी साजरी करण्यासाठी दुबईमध्ये. मी येतोय ‘महाराष्ट्र मंडळ दुबई’ यांनी आयोजित केलेल्या ‘खेळ मांडियेला’ या कार्यक्रमासाठी. तर बघुयात दुबईतील पहिली पैठणी कोण जिंकणार.

Tags: Aadesh Bandekarentertainmenthome ministerkhel mandiyelamarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Vaibhav Mangale request to his fans

“दुसऱ्या देशात जा”, दिवाळीमध्ये फटाके न फोडण्याचा सल्ला दिल्यानंतर वैभव मांगले ट्रोल, नेटकरी म्हणाले, “कलाकार आहात म्हणून…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.