शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दहा वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडबरोबर विवाहबंधनात अडकणार रणदीप हुड्डा, कोण आहे अभिनेत्याची होणारी बायको?

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 6, 2023 | 3:01 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
, randeep hooda is marrying long time girlfriend

, randeep hooda is marrying long time girlfriend

बॉलिवूडमधील दर्जेदार अभिनय साकारणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. आजवर चित्रपटात मोजक्याच भूमिका करत त्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘सरबजीत’, ‘लव्ह आज कल’, ‘लाल रंग’, ‘हायवे’ सारख्या दर्जेदार चित्रपटांतून त्याने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. रणदीपचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. आता त्याच्याशी निगडीत एक खुप मोठी बातमी समोर आली आहे. रणदीप लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याची मैत्रिण लीन लैश्राम हिच्याबरोबर तो लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. (randeep hooda is marrying long time girlfriend)

नोव्हेंबरच्या शेवटी हे जोडपं लग्न बंधनात अडकणार असल्याचं ‘इ टाईम्स’च्या नुकत्याच आलेल्या अहवालात समोर आलं आहे. एका सूत्राने या माहितीबाबत तारिख न सांगता बातमीची पुष्टी केली आहे. सुत्रांनूसार, “हे लग्न अतिशय खाजगी स्वरुपात असणार आहे. हा सोहळा मुंबईत होणार असून यात फक्त घरचे कुटुंबीय व जवळचा मित्र परिवार सहभागी होणार आहेत”.   

View this post on Instagram

A post shared by Lin Laishram (@linlaishram)

आणखी वाचा – Video : नाकात नथ, कपाळी टिकली अन्…; आमिर खानच्या लेकीचं महाराष्ट्रीयन पद्धतीने केळवण, होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला उखाणा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “रणदीप हुड्डा एक खासगी व्यक्ती आहेत. त्याला त्याच्या लग्नात मीडियाचं लक्ष वेधायचं नाही. लग्न संपन्न झाल्यानंतर त्याची घोषणा करण्यात येणार आहे. रणदीप व लिन यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलले नाही. पण त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टने त्यांच्या नात्याची पुष्टी दिली आहे. रणदीपने २०२१मध्ये लिनच्या वाढदिवशी पहिल्यांदा त्यांच्या नात्याबाबत पुष्टी केली होती. तेव्हा रणदीपने लिनला हॉट फज म्हटलं होतं”.

View this post on Instagram

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

आणखी वाचा – ऑनलाईन शॉपिंग स्कॅममध्ये अडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, तुमच्याबरोबरही घडू शकते अशी घटना, म्हणाली, “मी पूर्णपणे…”

लिन ही मुळची मणिपूरची असून ती एक मॉडेल आहे. तिचं सध्याच वय ३७ असून रणदीपचं वय हे ४७ वर्षे इतकं आहे. लिन लैश्रायनेही रणदीपला त्याच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचा सफारीदरम्यानचा फोटो पोस्ट करत तिने ‘हॅपी बर्थडे माय हॉट फज’, असं लिहिलं होतं. या फोटोत दोघेही बेज शर्ट, कॅप व गळ्यात स्कार्फ घातलेला दिसत आहे. रणदीप लवकरच ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटात दिसणार आहे. ज्यात तो स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा तोच सांभाळताना दिसत आहे.  

Tags: bollywood actorlin laishramrandeep hooda
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

operation sindoor soldier news
Women

आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

मे 10, 2025 | 2:32 pm
Jawan Murali Naik
Social

शेवटचा व्हिडीओ कॉल, मजुरी करणारे वडील अन्…; अवघ्या विशीत वीरमरण आलेल्या मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचा टाहो, एकुलता एक लेक आणि…

मे 10, 2025 | 2:01 pm
Arijit Singh
Entertainment

मनाचा मोठेपणा! अरिजित सिंगच्या हॉटेलमध्ये सर्वसामांन्यांना इतक्या रुपयांत पोटभर जेवण, गायकाच्या निर्णयाचं कौतुक

मे 10, 2025 | 12:41 pm
akshay kelkar wedding
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याची झलक समोर, लूकची जोरदार चर्चा

मे 10, 2025 | 11:26 am
Next Post
Rashmika Mandana Video Viral

Video : रश्मिका मंदानाचा आक्षेपार्ह बोल्ड व्हिडीओ व्हायरल, 'ते' पाहून अमिताभ बच्चनही भडकले, कायदेशीर कारवाईची मागणी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.