शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याची झलक समोर, लूकची जोरदार चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 10, 2025 | 11:26 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
akshay kelkar wedding

सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याची झलक समोर, लूकची जोरदार चर्चा

Akshay Kelkar Wedding : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर नुकताच बोहोल्यावर चढला आहे. ९ मे रोजी अगदी शाही थाटामाटात अक्षय केळकरने त्याची प्रेयसी साधना काकटकरसह विवाह केला. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. बरेच दिवसांपासून अक्षयच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. त्यांच्या लग्नापुर्वीच्या तयारीचे अनेक व्हिडीओही तो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करताना दिसला. अखेर आता अक्षय व साधना हिचा विवाहसोहळा पारंपरिक अंदाजात पार पडला आहे. अशातच अक्षयने शेअर केलेल्या त्याच्या शाही विवाहसोहळ्याची झलक व्हिडीओमधून पाहायला मिळतेय.

अक्षयने लग्नातील खास व्हिडीओ शेअर करत, “फायनली… रमाक्षय” असं कॅप्शन दिलं आहे. अक्षय व साधना यांनी अगदी पारंपरिक थाटामाटात लग्नसोहळा उरकला असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. जवळचे नातेवाईक, कलाकार मंडळी आणि कुटुंबियांच्या उपस्थित दोघांनी एकमेकांना वरमाला घालत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. लग्नासाठीच्या अक्षय व साधना यांचा लूकनेही साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. अक्षय व साधना यांनी लग्नसोहळ्यात खास लूक केला होता. साधनाने गुलाबी रंगाची सुंदर साडी, हातात हिरवा चुडा, दागिने आणि नाकात नथ असा पारंपरिक लूक केला होता. तर, अक्षयने पांढऱ्या रंगाच्या शेरवानीवर बायकोच्या साडीवर मॅचिंग होईल असा बेबी पिंक रंगाचा शेला घेतला होता.

आणखी वाचा – शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

यानंतर वरमाला घालताना दोघांचा हटके लूक पाहायला मिळाला. यावेळी अक्षयने सोहळ परिधान केलं होतं तर साधनाने गोल्डन-पांढऱ्या रंगाची सहावारी साडी नेसली होती. तर लाल रंगाचा दोघांनी मॅचिंग असा शेला घेत या लूकमध्ये भर घातलेली पाहायला मिळाली. साधनाचा सिम्पल मेकअप असलेला लूकही तिला खूप शोभून दिसत होता. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी अक्षय-साधनाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. सध्या या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा – अपघातानंतर पवनदीपवर पुन्हा शस्त्रक्रिया, आठ तास सुरु होतं ऑपरेशन, आता परिस्थिती अशी की…

लग्नाप्रमाणेच अक्षयच्या हळदीचे, मेहंदीचे आणि ग्रहमखचे फोटोही तुफान व्हायरल झाले. अक्षय व साधना यांचा #रमाक्षय हा हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे. अक्षय प्रेमाने त्याच्या पत्नीला रमा अशी हाक मारतो. गेली दहा वर्ष ही जोडी रिलेशनशिपमध्ये आहे. आता दहा वर्षांनी अक्षय व साधनाने त्यांच्या नव्या नात्याला सुरुवात केली आहे.

Tags: akshay kelkar and sadhana kakatkar weddingAkshay Kelkar Weddingmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Arijit Singh

मनाचा मोठेपणा! अरिजित सिंगच्या हॉटेलमध्ये सर्वसामांन्यांना इतक्या रुपयांत पोटभर जेवण, गायकाच्या निर्णयाचं कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.