मराठी अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकरने तिच्या सुमधुर आवाजाबरोबरच तिच्या सुंदर अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली. छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वात ती सर्वप्रथम प्रेक्षकांसमोर आली. ती जरी अंतिम फेरीत पोहोचली नसली, तरी तिच्या गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यानंतर ‘शाळा’ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केला. ‘टाईमपास’, ‘फुंतरू’ यांसारख्या चित्रपटांतून केतकीने आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. त्याचबरोबर तिचा ग्लॅमरस लूकही नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून त्यामुळे ती आज महाराष्ट्राची क्रश बनली आहे. (Ketaki Mategaonkar share a post about Mumbai pollution)
गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली. त्याचा परिणाम येथील नागरिकांवर होताना दिसत आहे. मुंबईतील प्रदूषणावर विविध क्षेत्रातील व्यक्तींसह अनेक कलाकार मंडळी व्यक्त होत आहे. अशात केतकीनेही सोशल मीडियावर एक पोस्ट करत या समस्येवर तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे.
हे देखील वाचा – रेड कार्पेटवर येताच ऐश्वर्या नारकर यांच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष, डिझाइन आहे फारच खास, म्हणाल्या, ” अविनाशनेच मला…”
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या केतकीने मुंबईतील प्रदूषणासंदर्भात नुकताच इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सर्वांचे लक्ष वेधलं. ती या पोस्टमध्ये मुंबई महापालिकेला टॅग करत म्हणाली, “गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या प्रदूषणात वाढ होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास, धुळीची ऍलर्जी, व्हायरल इन्फेक्शनचा प्रचंड त्रास होत आहे. तसेच इथे सुरु असलेल्या इमारतींच्या बांधकामांनी याकडे विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी जलकुंभाजवळ कोणताही कचरा फेकण्याआधी एकदा विचार करावा, अशी एक जबाबदार नागरिक म्हणून मी विनंती करते.” तिची ही स्टोरी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
हे देखील वाचा – Video : प्रसाद जवादे व अमृता देशमुखच्या लग्नापूर्वीच्या तयारीला सुरुवात, डान्स रिहर्सल करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल

केतकीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अंकुश’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. शिवाय तिचा ‘मीरा’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्यात प्रसाद ओक देखील दिसणार आहे.