रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“वाईट निर्णय आणि…”, अंकिता लोखंडे नवऱ्यासह ‘बिग बॉस’मध्ये गेल्यामुळे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नाराज, म्हणाला, “तू मला चुकीचं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 3, 2023 | 12:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ruchira Jadhav On Ankita Lokhande

"वाईट निर्णय आणि…", अंकिता लोखंडे नवऱ्यासह 'बिग बॉस'मध्ये गेल्यामुळे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नाराज, म्हणाला, "तू मला चुकीचं…"

‘बिग बॉस १७’ मध्ये अंकिता लोखंडे हिने तिचा पती विकी जैन बरोबर प्रवेश केला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात येण्याआधीपासूनच हे कपल चर्चेत असायचं. सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर तर हे कपल मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच कोणत्या ना कोणत्या कारणांवरून त्यांच्यात वाद होताना पाहायला मिळाला. (Ruchira Jadhav On Ankita Lokhande)

हिंदी ‘बिग बॉस’मधील अंकिताची एंट्री पाहता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेली पोस्ट सध्या चर्चेत ठरतेय. ही अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वात या अभिनेत्रीने सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच या अभिनेत्रीने चांगलाच धुमाकूळ घातला होता. अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात पतीबरोबर केलेला प्रवेश रुचिराला खटकलेला दिसतोय. रुचिराने अंकिताला पाठिंबा दर्शवत एक पोस्ट शेअर केली होती. रुचिराची अंकितासाठीची ही पोस्ट अधिक चर्चेत आली आहे.

आणखी वाचा – “४० दिवसांचा अवघड, खडतर प्रवास…”, ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होताच प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “कष्टाचं कौतुक…”

रुचिराच्या मते अंकिताचा पतीबरोबर ‘बिग बॉस १७’ मध्ये सहभागी होण्याचा निर्णय चुकीचा होता. “वाईट निर्णय, अंकिता, तू मला चुकीचं सिद्ध करशील अशी मला आशा आहे आणि शेवटी तुझं सर्वकाही चांगलं होईल,” असं म्हणत रुचिराने पोस्टमध्ये अंकिताचा एक फोटो शेअर केला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून अंकिता व विकीमध्ये प्रचंड भांडणं होत आहेत. अशातच रुचिराची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

आणखी वाचा – Video : उर्फी जावेदला रस्त्यांवर तोकडे कपडे घालून फिरणं भोवलं?, पोलिसांनी केली अटक, व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच अंकिता व विकी यांच्यात सुरु झालेल्या वादांमुळे त्यांचे मार्ग वेगळे होताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे ही या शोच्या प्रबळ स्पर्धकांपैकी एक आहे. पण पतीच्या कृत्यामुळे ती कमकुवत होताना दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून अंकिता पतीवर नाराज असल्याचं पाहायला मिळालं. विकी घरातील इतर स्पर्धकांबरोबर अधिक व्यस्त झाल्याने अंकिता त्याच्यावर नाराज झालेली पाहायला मिळाली. सध्या ते स्वतंत्र खेळ खेळताना दिसत आहेत.

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17entertainmenthindi actressmarathi actressruchira jashav
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Soldier Viral Video
Social

जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

मे 10, 2025 | 5:11 pm
Pakistani Anchor Viral Video
Entertainment

सेलिब्रिटींना शिव्या, पाकिस्तानी सैन्याचं दुःख सांगत रडली अन्…; अँकरचा कॅमेऱ्यासमोर ड्रामा, Video व्हायरल

मे 10, 2025 | 4:33 pm
Next Post
Kangana ranaut hints to contest loksabha election

कंगना रणौत करणार राजकारणात एन्ट्री, द्वारकाधीशचे दर्शन घेत लोकसभा निवडणूक लढण्याचे दिले संकेत, म्हणाली, “भगवान श्री कृष्णाची…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.