‘बिग बॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री व मॉडेल उर्फी जावेद ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या कपड्यांमुळे, तर कधी तिच्या वक्तव्यांमुळे. उर्फी ही नेहमीच तिच्या कपड्यांवर काही ना काही प्रयोग करताना दिसत असून त्याच कपड्यांमध्ये ती अनेकदा स्पॉट झालेली दिसते. तिच्या याच कपड्यांमुळे ती अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असून तिच्यावर अनेक तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे, तर तिच्या वक्तव्यांमुळे बऱ्याचदा चर्चेत राहते. आता उर्फीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला, जे पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहे. (Urfi Javed was Arrested)
काही महिन्यांपूर्वी उर्फीच्या आक्षेपार्ह कपड्यांमुळे तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलं होतं. तसेच ती याच कपड्यांमुळे अनेकदा ट्रोल झाली. आता उर्फी जावेदला नुकतंच पोलिसांनी अटक केली असून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका पापाराझी अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. ज्यामध्ये अभिनेत्रीला पोलिस स्टेशनला घेऊन जाताना दिसतं.
हे देखील वाचा – Video : महागड्या साड्या, किंमती वस्तू अन्…; असं आहे नीता अंबानींचं घरातील मेकअप रूम, Inside व्हिडीओ समोर
शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, उर्फी लाल रंगाचा बॅकलेस टॉप व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान करत एका कॉफी शॉपमधून बाहेर पडताना दिसली. तेव्हाच काही पोलिस अधिकारी तिच्यासमोर आले आणि तिला पोलिस स्टेशनला घेऊन जातात. उर्फीने यावेळी ‘कोणत्या कारणासाठी मला घेऊन जात आहे?’ असं प्रश्न करताच त्या पोलिसांनी तिला “एवढे तोकडे कपडे परिधान करून कोण बाहेर फिरतं का?”, असा प्रतिप्रश्न केला. आणि त्या पोलिस तिचा हात पकडून तिला पोलिसांच्या कारमध्ये बसवून घेऊन जातात. नेमकं कोणत्या कारणासाठी तिला अटक केली, हे अदयाप समोर आलं नाही.
हे देखील वाचा – “बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर आल्या पण…”, हॉटेल बंद झालं असल्याच्या चर्चांवर सुप्रिया पाठारेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या, “आई गेली आणि…”
उर्फीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केलं. तर काहींनी हा प्रसिद्धीसाठी हा प्रकार केला असल्याचं म्हटलं आहे. असं असतानाही काही चाहते तिच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहे. दरम्यान, उर्फीला खरोखरच अटक केलं की, हा पब्लिसिटी स्टंटचा प्रकार आहे का? अशी चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये रंगताना दिसते.