प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी नुकताच त्यांचा ६०वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. १ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या नीता अंबानी आजही या वयात खूपच सुंदर दिसत असून सौंदर्याच्या बाबतीत त्यांनी अनेक तरुण अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. त्यांच्या ड्रेसपासून ते मेकअपपर्यंत प्रत्येक गोष्टींची त्या नेहमीच काळजी घेत असतात. त्यामुळेच त्यांच्या लूकची सातत्याने चर्चा होत असते. विशेष करून, त्यांच्या साडी कलेक्शनची सोशल मीडियावर बरीच चर्चा होते. (Nita Ambani makeup room photo leaked)
मूळ शिक्षिका असलेल्या नीता अंबानी त्यांच्या पती व मुलांसह मुंबईतील प्रसिद्ध अश्या एंटीलिया हाऊसमध्ये राहतात. त्यांच्या या आलिशान घराची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांसह सर्वसामान्यांना मोठी उत्सुकता असते. मात्र, कधीही त्यांच्या या घराचे समोर आले नव्हते. अशातच त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या घरातील मेकअप रूमची एक छोटीशी झलक समोर आली आहे. जे पाहून अनेक जण चकित झाले आहे.
हे देखील वाचा – प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते ज्युनिअर बलैया यांचे निधन, राहत्या घरात गुदमरून मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
नीता अंबानी यांच्या घरातील मेकअप रूमचा एक व्हिडीओ नुकतंच समोर आला आहे. ज्यामध्ये विविध प्रकारचे सौंदर्य प्रसाधने, एक फोटो फ्रेम अश्या अनेक गोष्टी आहेत. नीता यांचे खासगी मेकअप मॅन मिकी कॉन्ट्रॅक्टर यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी “तुम्ही मनापासून हसत राहा आणि सर्वांना आनंद देत राहा” असं म्हणत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये नीता यांचा आलिशान असा मेकअप रूम पाहायला मिळतं. ज्यामध्ये विविध कंपन्यांचे महागडे परफ्युम, समोर एक मोठा आरसा, एक फोटो फ्रेम, विविध प्रकारचे महागडे सौंदर्य प्रसाधने आणि महागड्या साड्या दिसत आहे.
हे देखील वाचा – “वाईट वातावरणामध्ये…”, सोहेल खानचा घटस्फोट का झाला?, पूर्वाश्रमीच्या पत्नीचा मोठा खुलासा, म्हणाली, “भांडणामध्ये…”
या व्हिडीओमध्ये नीता यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली, ज्यामध्ये त्या अतिशय सुंदर दिसत आहे. पुढे नीता यांच्या मेकअप टीममधील काही मंडळी त्यांचं औक्षण करताना दिसतात. त्याचबरोबर, त्या महिला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद घेताना दिसले. यावेळी त्यांची होणारी सून राधिका मर्चंट देखील दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप मॅन असलेले मिकी कॉन्ट्रॅक्टर हे नीता यांच्या एका मेकअपसाठी जवळपास ७५ हजार ते ११ लाख रुपयांपर्यंतची फी घेतात.