‘झी मराठी वाहिनी’वरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’. या मालिकेने कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी ओळख आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या फेवरेट लिस्टमध्ये नक्कीच आहे. सध्या मालिकेत विविध वळण येत आहेत. पण या सगळ्यात अप्पी आपला प्रेग्नेंसीचा काळ इन्जॉय करताना दिसत आहे. त्यात आता अप्पीच्या डोहाळे जेवणाचं आयोजन करण्यात येणार आहे. मोठ्या थाटामाटात हे आयोजन ‘झी मराठी अवॉर्ड २०२३’च्या मंचावर करण्यात येणार आहे. (appi baby shower in zee Marathi award)
मराठी मालिका विश्वातील मानाचा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड’. हा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मालिकांचा व कलाकारांचा गुणगौरव करण्यासाठी या सोहळ्याचं विशेष आयोजन करण्यात येतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २०२३च्या भव्य दिव्य अवॉर्ड सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा अतिशय देखणा व दिमाखदार असणार आहे. या सोहळ्यात विविध मनोरंजनाचं आयोजन करण्यात येणार आहे. दिलखेचक परफॉर्मन्स, विनोदी स्किट्स यांचा मेळ या कार्यक्रमाला एक वेगळीच बहर आणणार आहे.

या सगळ्यात आणखी एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तो म्हणजे सगळ्यांच्या लाडक्या ‘अप्पीच्या डोहाळे जेवणा’चा कार्यक्रम जो मोठ्या धाटात साजरा केला जाणार आहे. ‘झी मराठी’च्या सर्व नायिकांनी या सोहळ्यात मिळून अप्पीचे डोहाळे पुरवणार आहेत. कलेक्टर अप्पीची पीए म्हणजेच छोटी छकुलीने अप्पीसाठी खास गाण्यावर धमाकेदार डान्सही बसवला आहे. अप्पीच्या डोहाळे जेवणात कार्यक्रमाला विविध मान्यवर हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित उपस्थित राहणार आहे. यावेळी तिने अर्जुनला अप्पीची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

डोहाळे जेवण कार्यक्रमाला खास सजावटही करण्यात आली आहे. झोपाळाही सजवण्यात आला आहे. ही सजावट करण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे.डोहाळे जेवणाला आलेल्या मान्यवारांना पेढा की बर्फीचा अशी विचारणा करण्यात आली. त्याचबरोबर या कार्यक्रमात अप्पीने कोणती वाटी उचलेली पेढा की बर्फी हे ‘झी मराठी अवॉर्ड’मध्ये पाहणं रंजक ठरणार आहे. आता हा धमाकेदार ‘झी मराठी अवॉर्ड २०२३’ सोहळा शनिवारी ४ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजता भेटीला येणार असून झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.