रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पेढा की बर्फी?, ‘झी मराठी’च्या मंचावर अप्पीच्या डोहाळे जेवणाचा थाट, पाहा खास फोटो

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 31, 2023 | 6:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
appi baby shower in zee Marathi award

appi baby shower in zee Marathi award

‘झी मराठी वाहिनी’वरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’. या मालिकेने कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी ओळख आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या फेवरेट लिस्टमध्ये नक्कीच आहे. सध्या मालिकेत विविध वळण येत आहेत. पण या सगळ्यात अप्पी आपला प्रेग्नेंसीचा काळ इन्जॉय करताना दिसत आहे. त्यात आता अप्पीच्या डोहाळे जेवणाचं आयोजन करण्यात येणार आहे. मोठ्या थाटामाटात हे आयोजन ‘झी मराठी अवॉर्ड २०२३’च्या मंचावर करण्यात येणार आहे. (appi baby shower in zee Marathi award)

मराठी मालिका विश्वातील मानाचा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड’. हा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मालिकांचा व कलाकारांचा गुणगौरव करण्यासाठी या सोहळ्याचं विशेष आयोजन करण्यात येतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २०२३च्या भव्य दिव्य अवॉर्ड सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा अतिशय देखणा व दिमाखदार असणार आहे. या सोहळ्यात विविध मनोरंजनाचं आयोजन करण्यात येणार आहे. दिलखेचक परफॉर्मन्स, विनोदी स्किट्स यांचा मेळ या कार्यक्रमाला एक वेगळीच बहर आणणार आहे.

आणखी वाचा – वयाची ६५शी ओलांडल्यानंतर अनिल कपूर यांनी स्वतःमध्ये केले आहेत इतके बदल, संपूर्ण लूकच बदलला कारण…

या सगळ्यात आणखी एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तो म्हणजे सगळ्यांच्या लाडक्या ‘अप्पीच्या डोहाळे जेवणा’चा कार्यक्रम जो मोठ्या धाटात साजरा केला जाणार आहे. ‘झी मराठी’च्या सर्व नायिकांनी या सोहळ्यात मिळून अप्पीचे डोहाळे पुरवणार आहेत.  कलेक्टर अप्पीची पीए म्हणजेच छोटी छकुलीने अप्पीसाठी खास गाण्यावर धमाकेदार डान्सही बसवला आहे. अप्पीच्या डोहाळे जेवणात कार्यक्रमाला विविध मान्यवर हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित उपस्थित राहणार आहे. यावेळी तिने अर्जुनला अप्पीची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

आणखी वाचा – “झोपून घे बाई…”, सई लोकूरच्या व्हिडीओवर क्रांती रेडकरची कमेंट, म्हणाली, “तुला व तुझ्या येणाऱ्या बाळाला…”

डोहाळे जेवण कार्यक्रमाला खास सजावटही करण्यात आली आहे. झोपाळाही सजवण्यात आला आहे. ही सजावट करण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे.डोहाळे जेवणाला आलेल्या मान्यवारांना पेढा की बर्फीचा अशी विचारणा करण्यात आली. त्याचबरोबर या कार्यक्रमात अप्पीने कोणती वाटी उचलेली पेढा की बर्फी हे ‘झी मराठी अवॉर्ड’मध्ये पाहणं रंजक ठरणार आहे. आता हा धमाकेदार ‘झी मराठी अवॉर्ड २०२३’ सोहळा शनिवारी ४ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजता भेटीला येणार असून झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.

Tags: appi aamchi collectorappi baby showermarathi serialzee Marathi award 2023
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Dhanashri Kadgaonkar share a video with Deepa Parab

Video : पार्टी सोडून रस्त्यालगतच्या दुकानामध्ये पाणीपुरी खायला आल्या धनश्री काडगावकर व दीपा परब, पाहा काय घडलं, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.