छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाने आजवर साऱ्यांना भुरळ घातली आहे. या या ककार्यक्रमाचे महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लाखो चाहते आहेत. तुफान विनोदी स्किट्स आणि कलाकारांचा अफलातून अभिनय यांमुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड लाडका बनला आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. नवोदित कलाकारानांही या मंचाने स्वतःची अशी एक नवी ओळख मिळवून दिली आहे. (Nikhil bane viral dance)
अभिनेता निखिल बने यालाही या कार्यक्रमामुळे लोकप्रियता मिळाली आहे. या कार्यक्रमानंतर त्याला अनेक चित्रपट व मालिकांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली. नुकताच निखिल रुपेरी पडद्यावर झळकताना दिसला. हास्यजत्रेतील दोन दमदार हास्यवीर गौरव मोरे आणि निखिल बने ‘बॉईज ४’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसले.
विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ फ्रॅन्चायझीमधील चौथा भाग ‘बॉईज ४’ हा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेता पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, ऋतुजा शिंदे, जुई बेंडखळे यांच्यासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार गौरव मोरे व निखिल बने देखील झळकताना दिसले. दरम्यान चित्रपट प्रदर्शनानंतर चित्रपटातील कलाकारांनी मिळून एका धमाल पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी सिनेविश्वातील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावलेली व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली.

नुकताच या पार्टीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिनय बेर्डे याने देखील चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली होती, त्यामुळे त्याच्यासह त्याची बहीण अभिनेत्री स्वानंदी बेर्डे ही देखील त्या पार्टीत हजर होती. स्वानंदीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यां व्हिडिओमध्ये ‘बॉईज ४’ मधील कलाकारांची धमाल पाहायला मिळाली. यावेळी भर पार्टीत निखिल बने बेभान होऊन नाचताना दिसतोय. निखिलचा हा धमाल डान्स उपस्थितही पाहत बसले.आजवर निखिलच्या हास्यजत्रेतील स्किटची सर्वत्र चर्चा रंगलेली दिसली आता मात्र निखिलचा हा डान्स चर्चेचा विषय बनेल एवढं मात्र नक्की.