रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ते प्रवचनात बोलताना…”, ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, “त्यांनी मला आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 26, 2023 | 4:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Baba Maharaj Satarkar Passed Away

"ते प्रवचनात बोलताना…", ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, "त्यांनी मला आणि…"

Baba Maharaj Satarkar Passed Away : प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज पहाटे सहा वाजता निधन झालं आहे. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची अपरिमित हानी झाली आहे. ज्येष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर हे जग सोडून गेल्याचं दुःख कलाकार मंडळींमध्येही पाहायला मिळालं. मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने आपल्या भावना व्यक्त करत बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

संकर्षणने भावुक होत एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने म्हटलं आहे की, “बाबा महाराज सातारकर, फार वाटायचं कधीतरी तुमच्या समोर बसुन, प्रत्यक्ष तुम्हाला पाहत, तुमचे अभंग, किर्तन, प्रवचन ऐकावं. आता ती संधी नाही गळा भरून आला आहे. माझ्या लहानपणी बाबांनी नवीन कॅसेट प्लेअर आणला होता, त्यावर लावलेली पहिली कॅसेट बाबा महाराजांची “आम्ही दैवाचे दैवाचे”. पहिल्यांदा मला तुकोबा, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि “रूक्मीणी पांडूरंग” यांची बाबा महाराजांच्या गोड आवाजांत “दास पंढरी रायांचे” हे ऐकत ओळख झाली.”

आणखी वाचा – वडिलांची नोकरी गेली, आई नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडली अन्…; प्रार्थना बेहरेने सांगितला ‘तो’ संपूर्ण प्रसंग, म्हणाली, “पैशांची अधिक गरज…”

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

यापुढे संकर्षणने लिहिलंय, “आजी आजोबांनी अनेक वर्षं वारी केली. चातुर्मासात चारही महिने पंढरपूरी मुक्कामी असायचे. आल्यावर आजी म्हणायची, “काय सांगू तुम्हाला पोरांनो. बाबा महाराज प्रवचनात बोलतांना त्यांच्या तोंडातून शब्दं मोत्यांसारखे बाहेर पडतात आणि डोळ्यांत माणिक चमकतांत” हे वर्णन ऐकून त्यांचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. तोच चेहरा डोळ्यासमोर आणुन रोज सकाळी त्यांच्या आवाजांत हरिपाठातल्या “बहुत् सुकृताची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी” हे ऐकतांना कित्ती गोड वाटतं काय सांगू? प्रवचन करतांना एखाद्या वाक्यानंतर, “काय?” किंवा किर्तनात अभंग गातांना लय वाढवण्यासाठी केलेलं “हं हं हं हं” हे आपल्याला प्रत्येक क्षणाला गुंतवून ठेवतं, ठेवत राहील !!”

आणखी वाचा – “हे नवरे लोक…”, वनिता-सुमितच्या फोटोवर हेमांगी कवीची कमेंट, वनिताच्या नवऱ्याचं उत्तर, म्हणाला, “पुढच्या वेळेपासून…”

पुढे तो असंही म्हणाला आहे की, “मला आजवर वारीला जाण्याचं भाग्यं नाही लाभलं पण, बाबा महाराजांनी मला आणि माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्या आवाजानी, स्वरांनी, श्रवणाने वारकरी केलंय. आज ते आपल्यातून गेले पण मी तरी या जगांत आहे तोवर रोजची सकाळ त्यांच्या आवाजातल्या हरिपाठानेच सुरू करीन ! आज बाबा महाराजांना भेटून साक्षात परमेश्वर पण त्यांच्याच आवाजांत ऐकुन पाठ केलेला अभंग म्हणत असेल, ‘धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंता जन्मीचा शीण गेला’.”

Tags: baba maharaj satarkarentertainmentkirtankarmarathi actorsankarshan karhadeSankarshan Karhade New Post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Vaibhav Mangale On Navratrotsav

"रात्री ११ पर्यंत गरबा खेळून नंतर नाचत देवी विर्सजनाची प्रथा कुठून आली?", वैभव मांगलेंचा संतप्त सवाल, नेटकरी म्हणाले, "भक्ती खोटी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.