मराठीतील विक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले यांनी तब्बल तीन दशकांहून अधिक काळ रंगभूमीसाठी स्वतःला वाहून घेतले. प्रशांत यांनी सुमारे ३२ नाटकांचे तब्बल १२ हजार ५०० हून अधिक प्रयोग केले आहे, जो एक विक्रम आहे. केवळ नाटकांमधून नव्हे, तर मालिका, रिॲलिटी शो व चित्रपटांमधूनही प्रशांत यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. ते केवळ अभिनेतेच नव्हे, तर उत्तम गायक, संगीतकार, दिग्दर्शक व नाट्य निर्मातेदेखील आहे. सध्या रंगभूमीवर त्यांचं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ व ‘सारखं काहीतरी होतंय’ हे नाटक सुरु असून त्या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (Prashant Damle replies to netizens on his look)
अभिनयाबरोबरच प्रशांत दामले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय राहतात. त्यांच्या कामासंदर्भातील माहिती त्यांच्या चाहत्यांना या माध्यमातून देत असतात. शिवाय, ते विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडत असतात. असाच एक व्हिडीओ नुकताच त्यांनी शेअर केला, जे सध्या चर्चेत आला आहे.
हे देखील वाचा – “इथून पुढे तुझं कठीण आहे”, देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर प्राजक्ता माळीवर चाहत्यांचा संताप, अभिनेत्री म्हणते, “काम होतं म्हणून…”
नुकतंच दसरा म्हणजे विजयादशमीचा सण साजरा झाला. त्यानिमित्त प्रशांत यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्या चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रशांत हे त्यांच्या नाटकाच्या बसची पूजा करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी काळ्या रंगाचा शर्ट आणि त्याच रंगाची पॅन्ट परिधान केला होता. जरी या लूकमध्ये प्रशांत सुंदर दिसत असले, तरी त्यांचा हा लूक एका नेटकऱ्याला खटकला. त्याने या व्हिडीओवर कमेंट केली, ज्याची सध्या चर्चा होत आहे.
हे देखील वाचा – लग्नापूर्वीच एकत्र राहत आहेत अमृता देशमुख व प्रसाद जवादे?, दसऱ्यानिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसली ‘ती’ गोष्ट, फोटो व्हायरल

एक नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, “दामले दादा, चांगले कार्य करताना काळे कपडे परिधान करायचे नसतात.” त्यांच्या या कमेंटवर प्रशांत यांनी “उघडा कसा येणार” असा हटके रिप्लाय देत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. प्रशांत यांची ही फेसबुक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्याचबरोबर, या पोस्टवर अनेक चाहत्यांनी त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.