मराठी सिनेसृष्टीत सध्या सीक्वेलचे वारे वाहताना दिसत आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांचे सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता यामध्ये आणखी एका चित्रपटाचं नाव जोडलं गेलं आहे, ते म्हणजे ‘झिम्मा’. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शित हा चित्रपट कोरोना लॉकडाऊन नंतरचा पहिला चित्रपट होता. ज्याला रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर जेव्हा याच्या सिक्वेलची घोषणा झाली, तेव्हापासून चाहते याची आतुरतेने वाट पाहत होते. आता या बहुचर्चित चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Hemant Dhome replys to fan on Jhimma 2 poster)
७ महिलांची परदेशवारी आणि त्या परदेशवारीत त्यांना आलेले अनुभव याचे सुंदर चित्रण या चित्रपटात करण्यात आले होते. चित्रपटाचे कथानक व त्यातील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना आवडला होता. आतापर्यंत या चित्रपटाच्या नव्या भागाचं मोशन पोस्टर व टीझर प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता नुकतंच याचं फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासह ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू व शिवानी सुर्वे हे कलाकार दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटात रिंकू आणि शिवानी यांची एन्ट्री झाल्याचे स्पष्ट होत असून या दोघी नेमकी कोणती भूमिका साकारणार? याची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली आहे.
हे देखील वाचा – माधुरी दीक्षितची मोठी घोषणा, मराठी कलाकारांना घेऊन करणार मोठा चित्रपट, पोस्टरही प्रदर्शित
हेमंतने इंस्टाग्रामवर हे पोस्टर शेअर केले आहे. हा पोस्टर शेअर करताना त्याने “तीच मज्जा आहे दुसऱ्याही डावात… आईच्या नाही, आज्जीच्याही गावात! तुमचे आमचे रियुनियन बरोबर एक महिन्यात” असं म्हटलं आहे. दरम्यान शेअर केलेल्या या पोस्टरवर एका चाहतीने कमेंट केली आहे, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या या पोस्टवर ती चाहती म्हणाली, “अगं बाई पाटील, आर्ची एडिशन आहे का यात. मग परश्या सिद्धार्थ चांदेकर साकारणार का? थोडी मज्जा.” त्यावर हेमंत ढोमेने “हो या बायांमुळे तो विहिरीत उडी मारणारच आहे एकदिवस! काय रे सिद्धार्थ चांदेकर ?”, असा रिप्लाय दिला आहे.
हे देखील वाचा – Video : ‘जीभ वापरून बाण …’, रावण दहनाला गेलेल्या कंगन राणौतकडून घडली चूक, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, जिओ स्टुडिओज, कलर येलो प्रॉडक्शन्स व चलचित्र मंडळी यांच्या बॅनरअंतर्गत आनंद एल राय आणि क्षिती जोग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या २४ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.