शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘बाईपण भारी देवा’ची क्रेझ काही संपेना, आदेश बांदेकरांच्या कार्यक्रमात चित्रपटातील गाण्यावर थिरकल्या हजारो महिला, व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 18, 2023 | 4:28 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Baipan Bhari Deva Movie

Video : 'बाईपण भारी देवा'ची क्रेझ काही संपेना, आदेश बांदेकरांच्या कार्यक्रमात चित्रपटातील गाण्यावर थिरकल्या हजारो महिला, व्हिडीओ तुफान व्हायरल

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बराच चर्चेत राहिला. चित्रपटाला प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सहा बहिणींच्या आणि एकूणच महिलांच्या भावविश्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सहा बहिणींभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकाने महिलांसह पुरुष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या अभिनेत्रींच्या सुंदर अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आलं. (Baipan Bhari Deva Movie)

३०जून रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा कित्येक दिवस सिनेमागृहात तग धरून होता. चित्रपटाच्या दमदार कथानकामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ७५ कोटींहून अधिक गल्ला जमावला. भारतातच नव्हे तर भारताबाहेरही या चित्रपटाची क्रेझ कायम होती. ‘बाईपण भारी देवा’ प्रदर्शित होऊन जवळपास तीन ते साडेतीन महिने उलटून गेल्यावरही या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. चित्रपटातील कथानकाने व चित्रपटातील गाण्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. याची प्रचिती नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान आली.

आणखी वाचा – राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या फोटोंमधून विवेक अग्नीहोत्रींनी करण जोहरला केलं क्रॉप, नेटकरी म्हणाले, “बालिशपणा…”

महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्या पाथर्डी येथील कार्यक्रमातील एक झलक इंस्टाग्रामवर पाहायला मिळाली. आदेश बांदेकर सूत्रसंचालनासाठी रंगमंचाच्या मध्यभागी उभे असताना समस्त महिला वर्ग ‘बाईपण भारी देवा’चं टायटल साँग गाताना दिसला. इतकंच नव्हे तर हजारो महिलांनी या गाण्यावर ठेकाही धरला. ‘बाईपण भारी देवा’ फेम शिल्पा नवलकर यांनी आदेश बांदेकरांच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ शेअर केला. या स्टोरीमध्ये त्यांनी चित्रपटाची क्रेझ आजही असल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, “अभूतपूर्व! ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे.”

आणखी वाचा – “माणुसकी जपली आणि…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीची समाजसेवा पाहून चाहतेही भारावले, म्हणाले, “ग्रेट आहेस कारण…”

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील गाणी आजही महिलांच्या मनात घर करून आहेत. कोणत्याही कार्यक्रमाला वा सणा सुदीला समस्त महिलावर्ग या गाण्यांवर ठेका धरल्या वाचून राहत नाहीत. हे खरं चित्रपटाचं आणि चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांचं यश आहे.

Tags: Aadesh Bandekaraadesh bandekar reacts baipan bhari devabaipan bhari devabaipan bhari deva 2023baipan bhari deva blockbusterentertainmentmarathi movieshilpa navalkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
UT 69 Trailer

पोलिसांसमोर कपडे काढले, झोपायलाही मिळेना अन्…; राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणावरील ‘UT 69’चा ट्रेलर प्रदर्शित

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.