शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’ फेम रोशेलच्या लेकीवर जन्मानंतर रुग्णालयामध्येच सुरु होते उपचार, एनआयसीयूमध्येही ठेवलं, अभिनेत्री म्हणाली, “खूप भीतीदायक…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 18, 2023 | 1:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rochelle Rao New Born Baby

'बिग बॉस' फेम रोशेलच्या लेकीवर जन्मानंतर रुग्णालयामध्येच सुरु होते उपचार, एनआयसीयूमध्येही ठेवलं, अभिनेत्री म्हणाली, "खूप भीतीदायक…"

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री रोशेल राव आणि कीथ सिक्वेरा यांनी नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे. दोघांनीही आई बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. रोशेल राव हिने काही दिवसांपूर्वी एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. काही दिवसांपूर्वी या जोडप्याने त्यांच्या चिमुकली बरोबरचा पहिला फोटोही शेअर केला होता. या फोटोमध्ये कीथने रोशेलचा हात धरला होता. त्यानंतर रोशेलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये तिने तिच्या मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या समस्या शेअर केल्या आहेत. (Rochelle Rao New Born Baby)

खरं तर, रोशेल व कीथच्या नवजात बाळाचा जन्म होताच त्या बाळाला एनआयसीयूमध्ये दाखल करावे लागले. रोशलने तिच्या इंस्टाग्रामवर यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या मुलीच्या जन्मापासून ते आत्तापर्यंतची एक झलक दाखवत तिने जन्मानंतर लगेचच तिच्या चिमुकलीला एनआयसीयूमध्ये कसे दाखल करावे लागेल, तसेच त्यांच्या बाळाचे वजन खूपच कमी होते, त्यामुळे बाळाला आपत्कालीन स्थितीत ठेवावे लागले याबाबत सांगितलं.

आणखी वाचा – “तुझा नवरा शाहरुखपेक्षा…”, शशांक केतकरच्या बायकोने शेअर केला किंग खानबरोबरचा फोटो, नेटकरी म्हणाले, “तो मराठी…”

व्हिडीओ शेअर करताना रोशेलने तिला होणाऱ्या वेदना व्यक्त करत म्हटलं, “तो क्षण खूप भीतीदायक होता. त्या काळात कुटुंबासोबत असणे नेमकं काय असत ते कळालं. बाळाला पहिल्यांदा पाहण्यापासून ते निद्रिस्त रात्रीपर्यंत सर्व काही खूप वेगळे होतं. हे क्षण गेले दोन आठवडे आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम आणि वेडेपणाचे ठरले आहेत. या लहान बाळावर आपण इतके प्रेम करू, असे कधीच वाटले नव्हते.” अभिनेत्रीने पुढे लिहिले की, “या सुंदर आशीर्वादासाठी देवाचे आभार. आशा आहे की आम्ही त्याला जीवनाची सर्वोत्तम आवृत्ती देऊ शकू.”

View this post on Instagram

A post shared by Rochelle Rao Sequeira (@rochellerao)

आणखी वाचा – “डोकं जमिनीवर आणि पाय…”, दिग्दर्शक केदार शिंदेंची लेकीसाठी पोस्ट, सल्लाही दिला, म्हणाले, “हे दिवसही सरतील पण…:

या व्हिडिओमध्ये या जोडप्याने आपल्या मुलीला पहिल्यांदा पाहण्यापासून ते तिची काळजी घेण्यापर्यंतचा प्रवास दाखवला. यावेळी त्यांनी त्यांच्या चिमुकलीची प्रकृती बरी केल्याबद्दल कुटुंबाचे तसेच घरातील मदतीचे आभार मानले आहेत. त्यानंतर आता चाहते रोशेल व कीथच्या लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags: bigg bossbigg boss 9entertainmentkeith sequeiranew born babyrochelle raoRochelle Rao & Keith Sequeira blessed with Baby GirlRochelle Rao New Born Baby
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Ekda Yeun tar Bagha teaser out

प्रसाद खांडेकरच्या 'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, ओंकार भोजनेच्या एन्ट्रीने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.