बॉलिवूडमध्ये देशभक्तीवर आधारित अनेक चित्रपट सध्या येत आहे. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची सर्वात जास्त चर्चा होती, त्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटाचा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारताचे पहिले फील्ड मार्शल आणि सेनाप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्यावर आधारित या चित्रपटात अभिनेता विकी कौशल मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. (Sam Bahadur Teaser)
१.२६ मिनिटांच्या या टीझरची सुरुवात एका दमदार डायलॉगने होते. “एक सोल्जर के लिए उसकी जान से ज्यादा कीमती होती है उसकी इज्जत… और एक सोल्जर अपनी वर्दी की इज्जत के लिए अपनी जान भी दे सकता है.”, असा डायलॉग आपल्याला विकीच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत विकी एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर, अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांची झलकदेखील आपल्याला पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा – “झाडू मारली, कलाकारांचे कपडे इस्त्री केले अन्…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा खुलासा, म्हणाली, “लोकांच्या लग्नात…”
त्याचबरोबर सॅम माणेकशॉ यांच्या जीवनातील अनेक प्रसंग यात अधोरेखित करण्यात आले आहे. शिवाय, टीझरच्या शेवटी सॅम माणेकशॉ आणि इंदिरा गांधी यांच्यातील एक संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांतच या टीझरला ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.
हे देखील वाचा – लवकरच विवाहबंधनात अडकणार जुई गडकरी, लग्नाबाबत प्रश्न विचारताच म्हणाली, “पत्रिका…”
‘राझी’ फेम मेघना गुलझार दिग्दर्शित या चित्रपटाची कथा १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असून या युद्धादरम्यान सॅम माणेकशॉ यांनी दिलेले योगदान चित्रित करण्यात आलेलं आहे. चित्रपटात फातिमा सना शेख इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सान्या मल्होत्राने सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. येत्या १ डिसेंबरला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. विकीचे चाहते व प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.