सर्वसामान्य माणूस असो, की मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी. प्रत्येकाला वाटतं की, आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची तारेवरची कसरत सुरु असते. अशातच नुकतंच एका अभिनेत्रीने त्यांच्या चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली होती. मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्री धनश्री काडगांवकरने काही दिवसांपूर्वी मुंबईत तिचं स्वतःचं घर खरेदी केलं होतं. आता धनश्रीने नुकताच तिच्या नव्या घराची सफर घडवून आणली आहे. (Dhanashri Kadgaonkar talks about her new Home)
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली धनश्री तिच्या फोटोज व व्हिडिओजद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. काही दिवसांपूर्वी तिने मुंबईत स्वतःचं घर खरेदी केल्याची आनंदाची बातमी इन्स्टाग्रामद्वारे तिच्या चाहत्यांना दिली होती. आता युट्युबवर तिने एक व्हिडिओ पोस्ट करत या नव्या घराची झलक घडवून आणली. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये धनश्री तिच्या कुटुंबियांसह दिसत असून ती या नवीन घराची झलक दाखवताना दिसते.
या व्हिडिओमध्ये ती तिच्या नवीन घराबद्दल बोलताना म्हणाली, “खरंतर १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत, ज्यादिवशी दुर्वेशचा वाढदिवस असतो. तेव्हा आम्ही मुंबईत आपलं घर होणार आहे, असं आम्ही ठरवून ठेवलं होतं. फक्त सकारात्मक ऊर्जा व्हावी म्हणून आम्ही ते लिहिलं होतं. आम्ही मुंबईत आलो, मी ‘तू चाल पुढं’ ही मालिका घेतली आणि केवळ तीन-चार महिन्यात आम्ही घर घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा आम्ही घरं पाहायला सुरुवात केली तेव्हा हे घर पाहिल्यानंतर आम्हाला दोघांनाही इतकं आवडलं. पहिल्यांदा दुर्वेशने पाहिलं होतं हे घर आणि नंतर मी पाहिलं. खूप हवेशीर, सुंदर आहे. खरंतर आम्हाला वरचा मजला हवा होता, जो नाही मिळाला. प्रथेप्रमाणे आमची आतापर्यंतची जी घरं आहेत, ती पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरच होतं. हे नवीन घरसुद्धा दुसऱ्याच मजल्यावर आहे.”
हे देखील वाचा – आधी ‘माकडचाळे’ म्हणून हिणावलं, आता अविनाश नारकरांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकरी करताहेत कौतुक, बायकोनेही केली कमेंट
“पण नंतर आम्ही असा विचार केला की, बाकी सगळ्या गोष्टी छान आहेत तर ही एक गोष्टही ठीक आहे. आणि आज आमच्या दोन्ही घराचं पझेशन आम्हाला मिळाली. आता लवकरच इंटिरिअर व अन्य कामे सुरू होतील. त्यानंतर आम्ही इथे शिफ्ट होणार आहोत.” त्याचबरोबर ती तिच्या घराच्या इंटिरिअरबद्दल बोलताना म्हणाली की, “मी माझ्या नवीन घराच्या इंटिरिअरसाठी माझ्या जवळच्या मित्र-मैत्रिणींकडून सल्ला घेत की, कसं घर झालं पाहिजे? एकूणच या इंटिरिअरचा खर्च भरपूर आहे. पण घरामध्ये सगळे पैसे गेल्यामुळे हे करण्यासाठी काहीच उरले नाही. पण ते लवकरात लवकर करू.”
हे देखील वाचा – “कोंबडं झाकल्याने…”, टोलवरून ट्विट केल्यानंतर तेजस्विनी पंडितच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्ल्यू टिक गायब, म्हणाली, “सामान्यांचा आवाज…”
धनश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती सध्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेत शिल्पी हे पात्र साकारताना दिसत आहे. जरी ती या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसत असली. तरी तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याचबरोबर ती नेहमीच तिच्या लेकाबरोबर मज्जा मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करत असते.