मराठी सिनेसृष्टीतील ९०च्या दशकातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. सध्या ही जोडी सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. या जोडीचे रिल्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण बऱ्याचदा अविनाश नारकर ट्रोल होताना दिसतात. नुकतंच त्यांनी शेअर केलेल्या एका रिल्सवर तर ट्रोलर्सनी ‘म्हतारा’ म्हणत त्यांना हिणवलं होतं. त्यावर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं होतं. पण ट्रोलर्सच्या ट्रोलिंगचा या कपलवर काहीही परिणाम होताना दिसत नाही. अविनाश यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याचं नेटकऱ्यांकडून बरंच कौतुक होताना दिसत आहेत. (avinash narkar share a workout video)
नारकर कपल नेहमीच विविध व्यायामाचे व्हिडिओ करत सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकताच अविनाश यांनी असाच एक वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात अविनाश सकाळीच व्यायाम करताना दिसत आहेत. विविध प्रकारच्या कसरती करत ते या वयातही किती तंदुरुस्त आहेत हे या शेअर केलेल्या व्हिडिओतून दिसत करत आहे.
हा व्हिडिओ शेअर करत अविनाश नारकरांना ट्रोल करणाऱ्यांना त्यांच्या फिटनेसमधून सडेतोड उत्तर दिलं असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत, ‘आपल्या शरीराचा आदर करा. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा’, असं लिहित त्यांनी आपल्या शरीराची काळजी घेण्याचा सल्ला दिला.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनीही या व्हिडिओवर लाईक व कमेंटचा वर्षाव केला आहे. ऐश्वर्या नारकरांनीही कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केला आहे. नेटकऱ्यांनीही कमेंट करत त्यांचं कौतुक केलं. एका नेटकऱ्याने, ‘लय भारी’, अशी कमेंट केली. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘फिट’, असं म्हणत त्यांच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे.