बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा अलिकडे आलेला ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर बराच गाजला. या चित्रपटाने जगभरात बरीच धुमाकुळ घातली होती. शाहरुखच्या या यशानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. शाहरुखच्या या वर्षी आलेल्या ‘पठाण’ व ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरंच यश मिळवलं. पण या चित्रपटाच्या यशानंतर शाहरुखला जीवे मारण्याच्या धमकीचे फोन यायला लागले होते. याबाबत त्याने राज्य सरकारकडे लेखी तक्रारही केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी शाहरुखची सुरक्षा वाढवली असून ती Y+ एवढी करण्यात आली आहे. (shahrukh khan in y + security)
राज्य सरकारच्य निर्देशानुसार आयजी व्हीआयपी सिक्युरिटीने शाहरुखच्या सुरक्षेत वाढ केली आहे. तैनात सुरक्षा सेवेला खाजगीरित्या निधी दिला जाणारा आहे. हा संबंधीत खर्च शाहरुख स्वतः करणार आहे. ही रक्कम तो राज्य सरकरला देणार देणार आहे. Y+ सुरक्षा ही उच्च धोका असलेल्या व्यक्तींनाच दिली जाते. यात धोका असलेल्या व्यक्तीच्या निवासस्थानी पाच सशस्त्र रक्षकांसह वैयक्तिक सुरक्षा अधिकारी तीन शिफ्टमध्ये चोवीस तास तैनात केले जातात. शाहरुखला आलेली धमकी लॉरेन्स बिश्नोईकडून आली असल्याचं म्हटलं जात असल्यामुळे त्याला ही अधिक Y+ सुरक्षा देण्यात आली आहे.
The Maharashtra government increases the security of Actor Shah Rukh Khan to Y+ after he allegedly received death threats. Shahrukh Khan had given a written complaint to the state government that he had been receiving death threat calls after the films 'Pathan' and 'Jawan'.:…
— ANI (@ANI) October 9, 2023
शाहरुखच्या हायऑक्टेन थ्रिलर ‘जवान’ चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ११०३.२७ कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट ७ सप्टेंबरला हिंदी, तामिळ तसेच तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. जागतिक स्तरावर या चित्रपटाने ११०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून एवढा मोठ टप्पा ओलांडणारा तो पहिलाच हिंदी चित्रपट ठरला आहे.
हा चित्रपट सामाजिक चुका सुधारण्याचा निर्धार करणाऱ्या माणसाचा प्रवास दाखवला गेला आहे. या चित्रपटात शाहरुखने विक्रम राठौर व त्याचा मुलगा आझाद या दुहेरी भूमिकेत दिसला आहे. तसेच या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती हे सहकलाकाराच्या भूमिकेत आहेत. तर दीपिका पादुकोण व संजय दत्त विशेष भूमिकेत आहेत.