अभिनेत्री अनुष्का शर्मा व विराट कोहली या सेलिब्रिटी जोडीची जगभरात मोठी फॅन फॉलोविंग आहे. लोक त्यांना एक आदर्श जोडी म्हणून नेहमी पाहतात. पण, सध्या ही जोडी एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. ती म्हणजे दुसऱ्यांदा आई-बाबा होण्याच्या बातमीमुळे. विराट व अनुष्काला ‘वामिका’ नावाची मुलगी असून आई झाल्यानंतर अनुष्का मुलीला अधिकाधिक वेळ देताना दिसते. त्यासाठीच तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे. आता दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आली असताना आणखी एका कारणामुळे अनुष्का नुकतीच चर्चेत आली आहे. (Anushka Sharma replys Virat Kohli’s Story)
क्रिकेट वर्ल्डकप सुरु होण्यास अवघे काही दिवस बाकी असून त्यानिमित्ताने देशभरात सध्या क्रिकेटचा फिव्हर पाहायला मिळत आहे. विराट कोहली सध्या वर्ल्डकपच्या तयारीत व्यग्र आहे. अशातच त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर नुकतीच व्हायरल झाली आहे. ज्यावर अनुष्काने दिलेल्या रिप्लाय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विराटने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांना वर्ल्डकप स्पर्धेचे तिकिटे न मागण्याची विनंती केली आहे.
हे देखील वाचा – “आम्हीच नंबर वन”, टीआरपीच्या खोट्या बातम्यांवर जुई गडकरीचा संताप, ‘प्रेमाची गोष्ट’बाबत विचारताच म्हणाली, “चुकीच्या गोष्टी…”
विराट या स्टोरीमध्ये म्हणतो, “वर्ल्डकप आता जवळ येत आहे. त्यामुळे मी माझ्या मित्रांना नम्रपणे सांगू इच्छितो की, मला वर्ल्डकप स्पर्धेच्या तिकिटांसाठी अजिबात विनंती करू नका. कृपया आपल्या घरातून या स्पर्धेचा आनंद घ्या.” त्यावर अनुष्का त्याची स्टोरी रिपोस्ट करत म्हणते, “आणि मला आणखी काही सांगायचं आहे. तुम्ही मला मॅसेज करून आम्हाला मदत करा, अशी विनंती करू नका. तुम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.” दोघांच्या या पोस्टची जोरदार चर्चा होत असून त्यावरून चाहते या दोघांकडे वर्ल्डकप सामन्यांची तिकिटे मागत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर ही पोस्ट पाहून नेटकरी अभिनेत्री दुसऱ्यांदा गरोदर असल्याची प्रतिक्रियाही देत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून लाईमलाईटमध्ये नसणारी अनुष्का पुन्हा आई होणार असल्याची चर्चा जेव्हा रंगली. त्याचवेळेस विराट तातडीने मुंबईला रवाना झाला होता. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी हे दोघे एका क्लिनिकबाहेर दिसले होते. तेव्हा त्याचे फोटोज पोस्ट न करण्याची विनंती त्यांनी पापाराझींकडे केली होती. त्यामुळे ती खरंच गरोदर आहे की निव्वळ अफवा, हे लवकरच स्पष्ट होईल.