छोट्या पडद्यावरील अनेक मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामध्ये स्टार प्रवाहच्या अनेक मालिका टीआरपीच्या शर्यतीत आपले स्थान कायम राखले आहे. मालिकेचा विषय, कथानक व कलाकारांची पडद्यावरील केमिस्ट्री यांमुळे या वाहिनीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. (Man Dhaga Dhaga Jodte Nava New Promo)
याच वाहिनीवरील एक मालिकेने अवघ्या कमी कालावधीत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे, ती म्हणजे ‘मन धागा धागा जोडते नवा’. घटस्फोटित महिला असलेली आनंदी आणि सार्थक यांच्या जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली. त्याचबरोबर मालिकेचा विषय, कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत आपले स्थान निर्माण केलं आहे. सध्या मालिकेत सार्थक व आनंदीची मैत्री प्रेमात रूपांतर होताना पाहायला मिळत आहे. मात्र, आनंदी घटस्फोटित असल्याचे कळताच आता त्याचे कुटुंबीय या लग्नाला विरोध करत आहे.
हे देखील वाचा – “आम्हीच नंबर वन”, टीआरपीच्या खोट्या बातम्यांवर जुई गडकरीचा संताप, ‘प्रेमाची गोष्ट’बाबत विचारताच म्हणाली, “चुकीच्या गोष्टी…”
अशातच या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच समोर आला. ज्यात असं दाखवण्यात आलं की, सार्थक आनंदीचा हात पकडून त्याच्या घरी घेऊन येतो. यावेळी सार्थकची आई व काकू दाराबाहेर थांबत तिला घरात घेण्यास विरोध करतात. तो आई आणि काकूचा विरोधाला न जुमानता आनंदीला घरातील देवघरात नेतो. आणि त्या देवघरातील कुंकू आनंदीच्या कपाळावर लावतो.
हे देखील वाचा – “वर्ल्डकपची तिकिटं माझ्याकडे मागू नका”, विराट कोहलीच्या पोस्टवर अनुष्का शर्माचा भन्नाट रिप्लाय, म्हणाली, “मला मॅसेज करुन…”
यावेळी सार्थक त्याच्या आई व काकूला सांगतो की, “आजपासून आनंदी माझी धर्मपत्नी आहे. माझ्या बायकोबद्दल एक अवाक्षरही ऐकून घेणार नाही.” आता सार्थकने आनंदीला लग्नाचे वचन दिल्यामुळे प्रेक्षकांना या दोघांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळणार का ? हे पाहणे रंजक ठरणार आहे.