प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे २०१८ मध्ये निधन झाले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या चाहत्यांसह कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे होतं. एकेकाळी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या या अभिनेत्रीच्या फिल्मी करिअरमधील अनेक चढ-उतार त्यांच्या खऱ्या आयुष्यातही घडून गेले. आपल्या अभिनय व सौंदर्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. असं असूनही लग्न, त्यातून आलेलं मानसिक दडपण यांमुळे त्यांनी काही काळासाठी सिनेसृष्टीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण, जेव्हा त्यांनी सिनेसृष्टीत परतण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत काळ निघून गेला होता. (Boney Kapoor talks about Sridevi’s Pregnancy before Marriage)
श्रीदेवी यांच्या खासगी आयुष्यात अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यातीलच एक अफवा पसरली होती, ती त्यांच्या लग्नाची. श्रीदेवी यांनी १९९६ साली शिर्डी येथे दिग्दर्शक, निर्माता बोनी कपूर यांच्याशी लग्न केले होते. त्यानंतर जानेवारीमध्ये जेव्हा बोनी कपूर यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नाची घोषणा केली, तेव्हा श्रीदेवी यांचा बेबी बंप दिसत होता. त्यावेळेस श्रीदेवी लग्नाआधीच गरोदर असल्याची अफवा पसरली गेली. आता बोनी कपूर यांनी अनेक वर्षानंतर या अफवांवर मौन सोडत मोठं वक्तव्य केलं आहे.
हे देखील वाचा – किंग खान शाहरुखच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटात झळकणार होता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर; पण झालं असं की…
बोनी कपूर यांनी नुकतंच प्रसिद्ध युट्युबर रोहन दुआ यांना दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवीसह लग्न व गरोदरपणाबाबत मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्यांच्या लग्नाबद्दल बोलताना ते म्हणाले, “शिर्डीमध्ये १९९६ साली माझं आणि श्रीदेवीचं लग्न पार पडलं. २ जूनला आम्ही लग्न केलं. आम्ही एकमेकांना वचनं दिली, जानेवारीत ती जेव्हा गर्भावस्थेत दिसली, तेव्हा आम्हाला आमच्या लग्नाबाबत सगळ्यांना सांगावं लागलं. जानेवारी १९९७ मध्ये आमचं लग्न थाटामाटात पार पडलं. त्यामुळेच काही लोकांचं असं मत आहे की, लग्नाआधीच श्रीदेवी गरोदर होती”.
हे देखील वाचा – “मराठीत बोलायला लाज वाटते?” भाषेवरून ट्रोल करणाऱ्यांना सई ताम्हणकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “आम्ही कोणत्या…”
त्याचबरोबर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील धार्मिक श्रद्धेबद्दल बोलले आहे. “मी असो किंवा श्रीदेवी असो. अनिल कपूर यांच्या पत्नी सुनीता असो, मी किंवा अनिल असो, किंवा माझी मुलगी जान्हवी असो. आम्ही सर्व धार्मिक आहोत. माझी पत्नी श्रीदेवी तिच्या प्रत्येक वाढदिवसाला तिरुपतीला पायी जायची. तसंच, जेव्हा मला त्रास व्हायचा, तेव्हा ती जुहूपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत अनवाणी पायी चालत जायची.”, असं बोनी कपूर म्हणाले.